उरण दि १५(विठ्ठल ममताबादे)ऑल इंडिया मास्टर्स गेम २०२० बडोदरा ही स्पर्धा मंजलपूर स्पोर्टस् कॅम्पलेक्स ,बडोदरा येथील क्रिडा संकुलात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे या स्पर्धेत जिल्हा परिषद रायगडच्या अंतर्गत मोडणा-या पनवेल येथील तालूका आरोग्य विभागात तालुका आरोग्य सहाय्यक या पदावर कार्यरत असलेले संतोष परदेशी यांनी गोळा फेक मध्ये सुवर्णपदकासह हॅमर थ्रो या क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळविले आहे.
आंतरराष्ट्रीय खेळाडू व उरणचे सुपुत्र संतोष परदेशी यांनी रायगड जिल्हा परिषद अलिबाग चे नाव क्रीडा क्षेत्रात जिल्हा ,राज्य, राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. अशा या खेळाडू ला कोणतीही शासकीय सेवा सवलती सेवा सुविधा,आर्थिक मदत नसताना देखील परदेशी यांची क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगीरी त्यांच्या जिल्हा परिषद विभागासाठी नेहमीच असते अशा या खेळाडू ला रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या कडुन २०१५ मधे "रायगड भुषण" पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. संपूर्ण भारतात रायगड जिल्हा परिषद ही पहिली जिल्हा परिषद आहे. की त्यांचा पहिला खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर जिल्हा परिषद चे नाव भरीव अशा कामगिरी ने उज्ज्वल करित आहे. सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव परदेशी यांच्यावर होत असताना त्यांना जि.प कडुन आर्थिक मदत , विषेश खेळाडू दर्जा ,स्पर्धापुर्व विषेश रजा देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. ऑस्ट्रेलिया,न्युझीलंड ,
मलेशिया,थायलंड,इंडोनेशिया व श्रीलंका असे यशस्वी दौरे पुर्ण करुन २०२१ मध्ये जपान सानसुई येथे होणा-या १० व्या जागतीक मास्टर्स गेम २०२१ या स्पर्धेत पुर्ण तयारीने सहभागी होण्यासाठी ते रांत्र दिवस मेहनत घेत आहेत.मात्र शासकीय सेवा सुविधा,शासकीय सवलती,आर्थिक मदती पासून वंचित असूनही आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडू संतोष परदेशी यांच्या जिद्दीचे,कौशल्याचे,कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. क्रीडा क्षेत्रातील बडोदरा येथील स्पर्धेत सुवर्णपदक व कांस्यपदक पटकाविल्याने त्यांच्यावर विविध क्षेत्रातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे