पनवेल : दि.10 एप्रिल 2020
लॉकडाउनमुळे हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची उपासमार होत असल्यामुळे याची गंभीर दखल शासनाने घेऊन असून राज्यातील गोरगरीब जनतेला उपाशी न ठेवता जेऊ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर पनवेल मनपा हद्दीत शुक्रवार दिनांक 10 एप्रिल पर्यंत 42,349 लोकांना जेवण दिले आहे.
यावेळी पनवेलमधील सामाजिक संस्थांनीही आयुक्त गणेश देशमुख व उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना मदत करणे शक्य झाले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी आयुक्तांनी आवाहन केले आहे की, ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी वस्तू रूपाने किंवा आर्थिक मदत करतील याचा सविस्तर अहवाल त्या त्या दानशूर व्यक्तीला प्रशासनामार्फत दिला जाईल. वस्तू रूपाने देणाऱ्या दानशूर व्यक्तीने जेवढे सामान दिले असेल तेवढ्या सामानाचे वाटप कसे झाले याचा अहवाल तर आर्थिक रूपाने देण्यात येणाऱ्या मदतीचा अहवाल त्या त्या दुकानदारांचे बिल आणि त्याचे किती पॅकेट तयार करून कोणत्या ठिकाणी देण्यात आले हे कळवून या साथीच्या रोगात माणुसकी दाखविण्याची एक उत्तम संधी स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली होती. या आवाहनाला पनवेलमधील उद्योजक आणि सेवाभावी संस्थांनी सढळ मदतीचा हात पुढे करून महानगरपालिकेच्या हद्दीत गरजूंना अन्नाचा घास दिला आहे.
*यासाठी भोजन समिती कार्यरत असून श्री.अरूण कोळी, श्रीमती विनया म्हात्रे व श्री.नवनाथ थोरात हे रात्रीचा दिवस करून काम करत आहेत.* तसेच निवारागृह तयार करण्यात आलेले आहे. त्याची जबाबदारी श्रीमती तेजस्विनी गलांडे, श्री. संजय हिंगमिरे व श्री.राजेश कर्डिले यांच्याकडे आहे. या निवारागृहात स्थलांतरीत मजूरांना निवारा उपलब्ध करण्यात आलेला आहे. अनेक बेघरांना देखील येथे निवारा उपलब्ध करण्यात आला आहे. सुमारे 300 व्यक्ती रोज अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था केली आहे.
यावेळी ज्या ज्या सेवाभावी संस्थांनी मनपाकडे मदत केली आहे त्या सर्वांचे आयुक्तांनी आभार मानले तसेच अजूनही अन्य उद्योजकांनी तसेच सेवाभावी संस्थांनी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन श्री. गणेश देशमुख यांनी केले आहे.