महाराष्ट्र नव्हेतर तर संपुर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आसल्याने लॉक डाऊन मुळे गोर गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे, या बाबत दखल घेत शासनाने हातावर पोट आसलेल्या गरजु लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवला आहे,या विषयाचे गांर्भिय लक्षात घेत पनवेल तालुक्यात बुधवारी दिनांक 8 एप्रिल पर्यंत 7 हजारा पेक्षा जास्त विना शिधाप्रत्रिका धारकांना रेशन व्यावस्था करण्यात आली,तसेच तहसीलदार अमित सानप यांनी सामाजिक संस्थानांना घातलेली साद मदत स्वरुपात यशस्वी झाल्यामुळे नागरीकांना मोठ्या प्रमाणात मदत करणे शक्य झाले असल्याचेही या वेळी सांगण्यात आले, तहसिलदार अमित सानप यांनी असे आवाहन केले की मदतगार दानशुर व्याक्तींनी वस्तु रुपान् मोठ्या स्वरुपात आर्थिक मदत करतील यांचा सविस्तर अहवाल त्या त्या मदतगार व्याक्तीला प्रशासना मार्फत दिला जाईल,दानशुर व्याक्तीने त्यांच्या परेने ज्या काही वस्तु दिल्या आसतील त्या सामानाचे वाटप कशा प्रकारे करण्यात आले याचा आहवाल त्या दुकानदारांचे बिल आणि किती पँकेट तयार करुन कोण कोणत्या ठिकाणी वाटण्यात आले हे कळवुन, कोरोना सारख्या महाभयंकर प्रभाव वाढत आसल्याने मदतगारांना मानुसकी दर्शवण्याची एक संधी आवाहना द्वारे करण्यात आली होती पनवेल मधिल सेवाभावी संस्थांनी आणि उद्योजकांनी मानुसकीची मिसाल कायम ठेवत मदतीचा हात पुढे करुन पनवेल तालुक्यातील गरजवंतांचा दोन वळेच्या पोटाचा प्रश्न मार्गी लावला आहे,शासनाच्या आहवानाला प्रतिसाद देत ज्या सेवाभावी संस्था आणि उद्योजकांने शासनाकडे मदत केली आहे त्यांचे आभार व्याक्त करत आजुनही अन्य उद्योजक आणि सेवा भावी संस्थांनी मोठ्या मनाने मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन श्री अमित सानप यांनी केली आहे