आधुनिक भारताचे निर्माते: डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
**************************************
विनोद पंजाबराव सदावर्ते
मोबा: ९१३०९७९३००
**************************************
आज भारताकडे संघराज्य व संघराज्यामध्ये विविध जातीधर्माचे लोक मोठ्या आनंदाने नांदताना आपल्याला दिसत आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही ज्या देशाच्या नावावर आहे तो भारत देश आणि जगातील सर्वात मोठे लिखित संविधान हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागातून अथांग ज्ञानामुळे निर्माण झाले. आज पर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांना एकाच जातीत एकाच धर्मात प्रस्थापितांनी बांधून ठेवले होते. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे कार्य लोकांना माहीतच होऊ नये यासाठी नियोजन बद्द कार्यक्रम येथील विघातक प्रस्थापीतांनी लावले होते. परंतू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच नाव जरी घेतल तरी समोर विद्वत्ता दिसते. ज्ञानाचा हा सुर्य येथील व्यवस्थेला झाकता आला नाही. आज पर्यंत एकाच जातीत बंद असलेले बाबासाहेब आज घराघरात पोहचत आहेत. यामध्ये सामाजिक संघटना व सोशल मिडिया यांचे खुप मोठे योगदान आहे. आज प्रत्येकांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या शी भावनिक नाते ठेऊच नये. वैचारिक नाते ठेवून सत्य तपासून बघितलं तर खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर आपल्याला समजतील. आज पर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांनी म़ाडणी एका जातीला धर्माला धरुनच केली आहे. म्हणून बाबासाहेब यांचे विचार घराघरात न पोहचता एकाच जातित बंद राहिले. बाबासाहेब आंबेडकर सांगताना जातीच्या बाहेर जाऊन एस सी एस टी ओबिसी व देशहीचे काम सांगणे आवश्यक असते. नाचुन जयंती साजरी करता यावी म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीत बांधण्याचे काम केले आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे बाबासाहेब कोणाचीच खाजगी संपती नाही. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते कसे याचा विचार करणे सुद्धा क्रमप्राप्त ठरतो. भारताचा पुर्वीपासून इतिहास बघितला तर भारतामध्ये विषमतावादी व्यवस्था बळकट करण्याचे काम येथील मनुच्या पिळावळीने केले. भारतामध्ये जेवढी विषमता होती व आजही आहे परंतु स्वरूप बदललेले आहे ऐवढी विषमता जगात कुठेच नव्हती व नाही. वर्ण, धर्म, जात, पंथ, वंश, लिंग, भुभाग, यावर आधारित विषमता फक्त आणि फक्त भारतात मध्ये बघायला मिळेल. हि विषमता नष्टच होऊ नये या साठी येथे वर्ग अहोरात्र आजही काम करताना दिसत आहे. विषमता प्रस्थापित असताना मानसाला मानुस म्हणून नव्हे तर पशु म्हणून जिवन जगावे लागत होते. वरच्या वर्णातील लोकांच्या सेवा व चाकरी करण्यासाठी इतर वर्ण तयार करून विषमतावादी व्यवस्था मजबूत केली. व हळूहळू हळूहळू वर्ण व्यवस्थेचे रूपांतर जाती आणि पोटजाती मध्ये मानुस मानसासापासुन दुर केला. शिक्षणा पासून दुर केला, थोडक्यात भारत जसा परकीय लोकांच्या गुलामीत होता त्याच पद्धतीने भारतातील लोक येथील व्यवस्थेच्या गुलामगिरी मध्ये होते. आणि विषमतावादी व्यवस्थेची गुलामगिरी तोडून समतावादी व्यवस्था निर्माण करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. डं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे व्यवस्थेची गुलामगिरी झुकारूण देण्याचे बळ येथील समाजा मध्ये आले भारतीय समाज पेटुन उठला , शिक्षण घेऊ लागला, बंड करु करू लागला न्याय आणि हक्क माघू लागला हे सर्व परिवर्तन फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे झाले. थोडक्यात मुक्याला बोलणं, लंगड्याला चालनं, बहिऱ्याला ऐकणं हे बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवले. म्हणून बाबासाहेब जगामध्ये महान आहेत.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे आमच्या जिवनामध्ये काय बदल झाले हे सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे. शोषक वर्गाने शोषित वर्गाचे शोषण वर्षानुवर्षे करत होते याच शोषित लोकांना प्रतिनिधित्व अर्थात सत्तेत वाटा बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मिळतोय. काल पर्यंत वरच्या वर्णाची गुलामगिरी व चाकरी करणारे लोक आज सत्तेत येऊन मांडीला मांडी लाऊन बसतील हि बात वरच्या वर्णाला स्वाभाविकच आहे पचणारी नव्हती. गुलामाने राजा व्हावे. हे या व्यवस्थेला मान्य नव्हते. एक नजर आपण गुलामांवर टाकली तर आपल्या लक्षात येते एस सी, एस टी, ओबिसी या प्रवर्गातील लोक व्यवस्थेचे गुलाम होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी तिन समांतर वर्ग तयार केले व सर्वांना या देशाचा राजा बणण्याचा अधिकार दिला. हे तिन वर्ग कोणते तर पहिला ओबीसी, कित्येक लोकांना माहीती नाही ओबिसीचे जनक बाबासाहेब आंबेडकर आहेत, ओबिसी चा अर्थ होतो इतर मागास वर्ग, या वर्गामध्ये कोण येतात तर जे लोक पुर्विपासुन गावामध्ये राहायचे, यांच्या स्पर्शाचा विटाळ होत नाही परंतु सत्तेमध्ये यांना वाटा नसुन कोणतेच हक्क अधिकार नसलेला वर्ग म्हणजे ओबिसी. ओबिसी मध्ये अनेक जाती आहेत. दुसरा वर्ग आहे तो एस सी. एस सी म्हणजे कोण तर ज्या लोकांच्या स्पर्शाने मानसाला विटाळ व्हायचा , ज्या लोकांना स्पर्श करणे पाप मानले जायचे तो वर्ग म्हणजे एस सी. एस सी मध्ये सुद्धा अनेक जाती आहेत. तिसरा वर्ग आहे एस टी एस टी म्हणजे जो समाज जंगलामध्ये भटकंती करतो, गावामध्ये प्रवेश नाही, जन्मतः गुन्हेगारी चा शिक्का असलेले वर्ग म्हणजे एस टी. हे तिनही शिक्षणा पासून दुर, सामाजिक दृष्टीने मागासलेले ठेवल्या गेलेला समाज होता. अशा समाजामध्ये उर्जा भरून समाजाला सत्तेत बसवण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. ज्यांच्या पुर्वजांना कधीच शाळा माहिती नव्हती वा शिक्षनाचा अधिकारच नव्हता अशा लोकांचे वारस आज शिक्षणमंत्री होत आहेत. ज्यांना गावात उभे राहण्याचा अधिकार नव्हता त्यांचे वारस आज मुख्यमंत्री होत आहेत, ज्यांच्या स्पर्शाने मानसाला विटाळ व्हायचा त्या लोकांचे वारस आज लाल दिव्याच्या गाडीत आहेत. हे सगळं शक्य झाले फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे. एवढ्या खोल गुलामगिरी मध्ये फसलेल्या लोकांना गुलिमीमधुन बाहेर काढून राजा बनवणे वाटते एवढे सोपे नव्हते परंतु बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे ते शक्य झाले. पण वास्तविकता ही आहे आम्हाला गुलामगिरीची सवय असल्याने राजा होण्याचा अधिकार असताना सुद्धां गुलामाचे काम करतात हि शोकांतिका आहे. जाती धर्माच्या वर्ण पंथ वंश एवढे भेद असताना सर्वांना एका रांगेत बसवणे कल्पना शक्तीच्या बाहेरचे होते. जेथे सावलीचा विटाळ होत होता तेथे सोबत बसायचं म्हणजे! विचार न केलेलाच बरा. जात धर्म पंथ वंश हे सगळं सोडून सगळे लोक एकत्र नांदत आहेत हे फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे.
महिलांची परिस्थिती तर कल्पना शक्तीच्या बाहेरची होती जेथे महिलांचा चेहरा पर पुरूषाने बघु नये अशी परिस्थिती असताना, स्त्रिने घरात कधी सल्ला देऊ नाही किंवा मत मांडू नाही असा अलिखित नियम असताना बाबासाहेब आंबेडकर यांना समान न्याय समान अधिकार देण्यासोबतच या देशाचे भविष्य उज्वल होण्यासाठी मानसांप्रमाणेच महिलांना सुद्धा मत देण्याचा अधिकार बहाल करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर एकमेव होते. स्त्रियांना पुरूषांच्या बरोबरीने अधिकार देण्यासाठी ही व्यवस्था कधिच तयार नव्हती वा आजही नाही परंतु बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे ते सक्तिने करावं लागते. महिलांना शिक्षण, नोकरी, फिरण्याचे स्वातंत्र्य, संपती बाळगण्याचा अधिकार, हि बाबासाहेब आंबेडकर यांचीच देण आहे. मत देण्याचा अधिकार एस सी एस टी ओबिसी च्या लोकांना मिळुच नये म्हणून व्यवस्थेच्या ठेकेदारांनी खुप विरोध केला परंतु बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळातच मत देण्याचा व एस सी एस टी ओबिसी बांधवांना राजा होण्याचा अधिकार बहाल करून दिला. एस सी एस टी ओबिसी समाज गुलामांचे जिवन जगत होता म्हणून यांना कोणतेच हक्क अधिकार नव्हते परंतु बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे गुलामीतून माणसात आले आणी माणसाला जे हक्क अधिकार पाहिजे त्या पेक्षा जास्त बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले देशामध्ये कोठेही फिरण्याचा, व्यवसाय, नोकरी करण्याचा, ईच्छेनुसार खानपान करण्याचा, सभा घेऊन मत मांडण्याचा, संपती बाळण्याचा, हे सर्व अधिकार बहाल करून अधिकारांना संरक्षण सुद्धा दिले. भारतातील लोकांचे जिवन पशुसम होते यांना स्वाभीमान व आत्मसन्मान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मिळाला आहे. एखाद्या देशाची पायाभरणी करायची असेल तर अगोदर त्या देशातील लोक शिक्षण, जागृत पाहिजे, त्या देशातील लोकांकडे निर्णय क्षमता पाहिजे। बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व काही दिले. मानसा साठी लढा देताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी प्रथम आणि अंतिम ही भारतीय आहे. धर्माची उपासना प्रचार प्रसार करण्याचे स्वातंत्र्य बहाल करतानाच तो घराच्या चौकटीत ठेवून घराबाहेर जगताना भारतीय म्हणून जगण्याची शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. देशाचा सन्मान करून देशाच्या उज्वल भविष्यासाठी सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन जाती धर्माचा नव्हे तर देशहिताचा विचार करून देशाला शक्तीशाली बनवतील याच साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष होता.
समाजामध्ये सामाजिक समता, सामाजिक न्याय, सामाजिक प्रतिनिधित्व, यांच्या द्वारे देशाची परिस्थिती मजबूत करणे, जल, विद्युत, उर्जा, कृषी यामध्ये देश संपन्न होईल यासाठी विविध योजना आखणे, नदीजोड प्रकल्प, हिंदु कोडबिलाच्या माध्यमातून स्त्रियांच्या आत्मसन्मानाची लढाई, स्वतः च्या ज्ञानाचा फायदा देशासाठी बहाल करून रिझर्व्ह बँकेची स्थापना, एस सी एस टी ओबिसी यांची माणुस म्हणून ओळख, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करून स्वहीत न बघता देशहिताला प्राधान्य देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या च मुळे आज हा वैभवशाली देश अखंडपणे उभा आहे. भारतातील एस सी एस टी ओबिसी चा माणुस सुखाचा श्वास जरी घेतो तो अधिकार बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. अशापद्धीतीने भारताची मजबूत पाया भरणी करून बाबासाहेब आंबेडकर भारताचे निर्माते झाले.
*************************************
विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगाव ता. मेहकर