असोसिएटेड क्लब आँफ प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक्स मेडीयाच्या


पनवेल/प्रतिनिधी
सध्या कोरोनाचे वाढत्या संकटाने आणि लाॅकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. अनेक सेवाभावी संस्था अन्नधान्याचे वाटप करत आहेत. मात्र सध्या किती लोक या संकटात आहेत त्याची माहिती शासन आणि महापालिकेला असते. यामुळे अशाप्रकारची मदत ही सेवाभावी संस्था करत असतात. परंतु काही दाते प्रत्यक्षात  जावून मदत करून आपले फोटो सोशल मिडियावर पाठवत असतात. परंतु कळत ना कळत  ते संसर्गाला आमंत्रण देत असतात. संसर्ग टाळण्यासाठी शासन आणि महापालिकेमार्फत आपण मदत केल्यास ती मदत अनेक ठिकाणी वेळेवर पोहोचू शकते. अशाच प्रकारे *असोसिएटेड क्लब  प्रिंटआँफ अँड इलेक्ट्रॉनिक्स मेडीया* *(नियोजित) महाराष्ट्र राज्य* या संघटनेने सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेऊन पनवेल मधील हातभर पोट असणाऱ्यांसाठी दोनशे जनांसाठी शिजवलेले अन्न लोकांकितचे  संपादक संजय पवार, लोकनिर्माणचे संपादक बाळकृष्ण कासार,  लोकटाईम्सचे उपसंपादक सुनिल भुजबळ यांच्या मार्फत पनवेल महापालिकेच्या अधिकृत कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केले.