पनवेल/प्रतिनिधी
पनवेल महानगर पालिका आयुक्त यांच्या वतिने उपायुक्त (जनसंपर्क) जमीर लेंगरेकर यांनी पनवेल मधिल केारोनाचा प्रादुर्भाव वाढत आसल्याने नागरीकांची भाजीपाल्या सारख्या अत्यावश्यक बाबींसाठी होत असलेली परवड थांबवण्यासाठी शेतक-यांकडुन थेट ग्राहकांपर्यंत भाजीपालाचे वितरणास सुरूवात केली असून नवीन पनवेल मधील सेक्टर ७ मधील आदर्श साेसायटीमध्ये आज शेतकरी रवी शेळके यांनी उत्कृष्ट दर्जाची भाजी रास्त भावात वितरीत केली. आदर्श सोसायटीचे अध्यक्ष रमेश चव्हान , सेक्रेटरी महादेव ढवळे, दैनिक लोकांकीत,पत्रकार संजय पवार,सोसायटी चे पदाधिकारी आणि तेथील रहिवाशी यांनी सोशल डिस्टींगशनचे काटेकोर पालन करुन भाजी खरेदी केली. पनवेल उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी केलेल्या या नियोजनाचे कॊतुक करण्यात येत आहे. यापुढे अशा प्रकारचे नियोजन केल्यास बाजारात गर्दी न होता कोरोनावर मात होऊ शकते.