संपुर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे देशात लॉक डाऊन परिस्थिती निर्माण झाली आहे. हातावर पोट असलेल्या गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे अनेक सामाजिक संघटना सर्वसामान्य जनतेसाठी आहोरात्र काम करत आहेत,लोकांना अन्नधान्य,जेवन देऊन वेळोवेळी मदत करत आहेत,अनेक असे आदिवासी पाड्या आहेत त्यांच्या कडे कोणाचे लक्ष जात नाही, खारघर मधे आशिच काही गावे आहेत,चाफेवाडी आणि फणसवाडी. येथिल आदिवासी पाड्यात रायगड जिल्हा आध्यक्ष शिरीष घरत यांच्या हस्ते गावांतील प्रत्येक घराघरात एक दिवस आड अन्नधान्यांचे वाटप होत आहे, अदिवासी पाडेच नव्हे प्रत्येक ठिकाणी
जाऊन गरजु लोकांना मदतीचा हात देत आहेत, यावेळी त्यांच्या सोबत महानगर प्रमुख रामदास शेवाळे,उप महानगर प्रमुख दीपक घरत,शहर प्रमुख शंकर ठाकुर, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णु गवळी, बाबुभाई, शिवसैनिक मयुर घरत,तसेच खारघर पोलिस स्टेशन मधिल कर्मचारी उपस्थित होते