बोरखेड मध्ये पाण्यासाठी  रात्री जागुन काढाव्या लागतात तर दिवसा उडते झूंबड , पाण्यासाठी सामाजिक अंतराची ऐसीतैसी , सरपंच ग्रामसेवक,तलाठी बेफिकीर :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


बोरखेड:उन्हाळा वरचेवर कडक चालला असुन कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर घराबाहेर न निघणारे गावकरी पाण्यासाठी मात्र जिवावर उदार होऊन सामाजिक अंतराचे भान न राखता पाणी मिळवण्यासाठी झगडताना दिसतात याच वेळी सरपंच , ग्रामसेवक ,तलाठी हे कोरोनाच्या नावाखाली गावातील ईतर मुलभूत सुविधांकडे कानाडोळा करताना दिसतात, कोरोना विषाणुच्या विरोधातील लढाईत ईतर पिण्याचे पाणी, शौचालय , आणि जिवनावश्यक गोष्टिकडे प्रशासनाने दुर्लक्ष करु नये .


सविस्तर माहितीसाठी :- बीड तालुक्यातील मौजे बोरखेड येथिल ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी मोठी दमछाक होत असुन कधी दुपारी रखरखत्या ऊन्हात तर कधी मध्यरात्री सुद्धा पाण्यासाठी ताटकळत राहुन  रात्र जागुन   काढावी लागते.


यादव मल्हारी बोराडे :-


दिवसातून केवळ १-२ तास पाणी सुटते , त्यामुळे गर्दि जमा होते , कधी भर दुपारी उन्हात तर कधी सगळी रात्र पाण्यासाठी जागुन काढावी लागते पाण्याची समस्या वरचेवर अवघड होत चालली असुन विहिरीतच पाणी कमी असल्यामुळे पाण्याच्या टाकीत पाणी चढत नाही.गोलंग्रीच्या तलावा वरुन ही पाईपलाईन आणली आहे.


पल्लवी शिंदे :-


 मी अकरावीत शिक्षण घेत असुन बोरखेड येथिल होस्टेलला राहते. ऐअर वांल काढल्यानंतर हे पाणी सुटले आहे , विहीरीत कमी पाणी असल्यामुळे टाकीतून पाणी पुरवठा होत नाही. इथं ज्याची लाठी त्याची म्हैस या म्हणीप्रमाणे जे जास्त घागरी नंबरला लाऊन ठेवतात त्यांनाच जास्त पाणी मिळते, ईतरांना फार तर एक-दोन घागरी पाणी मिळते.


गयाबाई घोडके :-


आमच्या सारख्या म्हता-या माणसाला  पाण्याचा जास्त त्रास होत आहे, मला संधिवात असल्यामुळे घागर घेऊन चालता येत नाही.८-१० दिवस नळाला टाकीचे पाणी येत नाही, 


डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर :-


कोरोना विषाणुच्या विरोधातील लढाईत ग्रामस्थांच्या पिण्याचे पाणी, शौचालय आदि.गोष्टिकडे सरपंच , ग्रामसेवक ,तलाठी कानाडोळा करताना दिसतात, कागदोपत्री घोडे नाचवून वरिष्ठांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करतात. संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसुन त्यांना या अडचणींचा सामना करावा लागत नाही त्यामुळे मा.राहुलजी रेखावार जिल्हाधिकारी बीड तथा अध्यक्ष आपत्ती निवारण व्यवस्थापन व निवारण प्राधिकरण यांनी दि. २३ मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार कर्तव्यात कसूर केल्याबद्दल संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी मा.राहुलजी रेखावार साहेब जिल्हाधिकारी बीड यांना लेखी निवेदनाद्वारे डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.