उरण मध्ये सध्या 2 कोरोना पॉज़िटिव रुग्ण. नागरिकांना सतर्क राहण्याची गरज. गावागावात-घरोघरी जावून सर्वेक्षणाचे काम सुरु.





 

 

उरण दि 3(विठ्ठल ममताबादे)करोना रुग्णाची वाढती संख्या व धोके लक्षात घेवून केंद्र सरकारने सध्या लॉकडाऊनचा कालावधी 17 मे पर्यंत वाढविला आहे. करोना या विषाणुजन्य रोगामुळे सर्वत्र हाहाकार माजला असून अनेक जणांचे यात बळी गेले आहेत. उरण मध्ये या रोगाने प्रवेश केला असुन आज पर्यंत उरण तालुक्यात एकूण 6 रुग्ण करोना बाधित आढळले होते त्या पैकि 4 रुग्ण बरे होवून ते घरी परतले आहेत तर उरलेले मोरा येथील 2 रुग्ण पोलिस पती व पत्नी यांचे रिपोर्ट पॉज़िटिव आले आहेत.तर त्यांच्या घरातील इतर कुटुंबाचे रिपोर्ट निगेटिव आले आहेत.त्यामुळे  उरण मध्ये सध्या एकूण 2 रुग्ण पॉज़िटिव आहेत.अशी माहिती उरण तालुक्याचे आरोग्य अधिकारी राजेंद्र इटकरी यांनी दिली आहे.

 

करोना रोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे. बाजारात  जाताना किंवा अन्य महत्वाच्या कामासाठी घरा बाहेर पडताना सोशल डीस्ट्न्सिंग चे नियम पाळावेत.कोणत्याही ठिकाणी गर्दी करु नये. विशिष्ठ अंतर ठेवून एकमेकांना बोलावे.

विणाकारन कोणी घरा बाहेर पडू नये.विशेषतः लहान मुले तसेच वयोवृद्ध व्यक्ति घराबाहेर जाणे टाळावे.ज्यां व्यक्तिंना ब्ल्डप्रेशर आहे शुगर आहे ,श्वसनाचे विकार आहेत अश्या व्यक्तिनी विशेष खबरदारी घ्यावी. शासनाने वेळोवेळी केलेल्या सुचनांचे नागरिकांनी पालन करावे.करोना रोगा संबंधित लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा.महाराष्ट्र शासना तर्फे आवश्यक ते खबरदारी घेण्यात येत असून तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, डॉ मनोज भद्रे, डॉ दिपक चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कर तसेच आरोग्य कर्मचा-यां तर्फे गावागावात घरोघरी जावून सर्वेक्षणाचे काम सुरु आहे नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे  असे आवाहन उरण तालुक्याचे आरोग्य अधिकारी राजेंद्र इटकरी यांनी केले आहे.