नवीन पनवेल मधील गुरुद्वारात मोफत जेवण. रोज १५००० जण घेतात लाभ

नवीन पनवेल/
कोरोनाच्या पाश्वभुमीवर सध्या अनेक सामजिक संस्था जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करतात. तर काही ठिकाणी जेवनाचे वाटपही करत आहेत. त्यातच सामाजिक भान ठेऊन नविन पनवेल मधील गुरुद्वारात अनेक दिवस मोफत अन्न वाटप करत आहेत. या ठिकाणी दररोज १००० हून जास्त गरीब जेवनाचा लाभ घेत आहेत. 
      गुरुद्वारा गुरु नानक दरबार साहिब, नवीन पनवेल परिस्थिती स्थिर होईपर्यंत कोविड -१९ द्वारे प्रभावित झालेल्या गुरु साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्वाना सहकार्य करण्यास वचनबद्ध आहे.
         २१ मार्च २०२० रोजी गुरुद्वाराच्या सदस्यांच्या मदतीने आम्ही आमची मोहीम सुरू केली आणि आज आमच्या लंगर फूड डिस्ट्रीब्यूशन मोहिमेमध्ये नवी मुंबईतील सर्व लोकांना मोठा प्रतिसाद मिळाला यासाठी गुरुद्वारा गुरु नानक दरबारच्या अध्यक्ष हरविंदर सिंग बटर, बलविंदर सिंग सेमी, जगतजित सिंग बटर, रविंदर सिंह जंदीर,अमरजित सिंग परिश्रम घेत आहेत.दररोज ५५० किलोपेक्षा जास्त तांदूळ, ३५० किलो डाळ आणि ३०,०००रोटी तयार करुन 
त्याचबरोबर स्वयंसेवकांची ८ पथके नवी मुंबई नोडमध्ये १२ पथके वेगवेगळ्या ठिकाणी लंगरचे वितरण करीत आहेत. 
         आतापर्यंत साातत्याने ५० दिवस   सरकारी प्राधिकरणांकडून विनंती केल्यानुसार आम्ही पनवेल स्थानकातून आपापल्या मूळ राज्यांत स्थलांतरित  मजुरांसाठी अन्न तयार करणे व पॅकेट वितरण करण्यात मदत करत आहोत. 
           या महामारीवर मात करण्यासाठी गुरुद्वारा साहिब सर्वांच्या सुरक्षिततेसाठी निर्जंतुकीकरण (सॅनिटायझिंग) ड्राइव्ह देखील राबवित आहेत.
     नवी मुंबईत सध्या निवासी कॉम्प्लेक्स, पोलिस स्टेशन आणि ड्युटी क्षेत्र, कार्यशाळेची ठिकाणे आणि शाळा येथे सेनेटिझाइंग सर्व्हिस चालविली जात आहे.