मदिरा ..
वाढले लाॅक डाऊन
महाग पडली सुट्टी
थेंब भर औषध ते
तळीरामा नसे ओठी
जाम अन् बर्फाच्या
थांबल्या गाठी भेटी
चकणा तो एकटाचं
खुतून बसला पोटी
द्यावया नाही लागत
कारणे खोटी खोटी
खिदळणे बंद झाले
भांडी घासा खरखटी
पाऊले चाले सुलटी
विसरलीआता उलटी
जीभ बोले शब्दस्पष्ट
नजरही नाही चोरटी
वाईटात घडे चांगले
सुटू लागे दारू हट्टी
नवा करू श्रीगणेशा
कोरी होई स्वच्छपाटी
-हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
2)
सलामी ..
करोना योध्द्या दिली
लष्करी दल सलामी
विहंगम दृश्य असले
प्रथम पाहीले आम्ही
देश वासीया अंतरी
तेजाळली नवी उर्मी
माणूस जपे माणसां
देश असे हा निधर्मी
द्योतक हे संस्कृतीचे
नाही केवळ सलामी
विरळा वेगळा विश्वां
भारतीय हा असामी
बाय बाय रे कोरोना
पुरे तव सत्ता जुलमी
भारतीय हो आम्ही
मान्य नाही गुलामी
-हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996..
सर नमस्कार कविता प्रस्तुत कृपया प्रकाशित करावी ही नम्र विनंती