(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)
विरोधी पक्षनेते असताना डॉ.अशोक थोरात जिल्हाशल्यचिकित्सक बीड यांची बदली करण्यात यावी कारण त्यांच्या विषयी गंभीर आक्षेप आहेत आणि त्याचे पुरावे आपण मुख्य निवडणूक आयुक्त यांना दिलेले आहेत.आणि आज आपण सत्तेत आल्यावर पालकमंत्री बीड असताना डॉ.अशोक थोरात यांच्या विषयी इतक्या गंभीर तक्रारी येऊन सुद्धा आपण काही कारवाई करत नाही आहात, हे अनाकलनीय आहे,म्हणुनच म्हणतोय हे दुटप्पी वागणं बरं नव्हं
पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब विरोधी पक्षनेते असतानाचे आरोप
----------------------------------------------- धनंजयजी मुंडे है विरोधी पक्षनेते असताना त्यांनी दि. २७ फेब्रुवारी २०१९ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त,राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांन लेखी पत्र दिले होते.जा.क्र.वि.प.ने./म.वि.प./२९१/२०१९, विषय:-डॉ अशोक संपतराव थोरात, जिल्हा शल्य, चिकित्सक, जिल्हा रुग्णालय बीड यांची आचारसंहीतेपुर्वी तात्काळ बदली करणेबाबत.
यामध्ये आपण पुराव्यानिशी केलेले आरोप खालिल प्रमाणे
१) आरोप नं १ , डॉ.अशोक थोरात गर्भपात प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल झालेले आरोपी आहेत
----------------------------------------------- आज सद्यस्थितीत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी डॉ.थोरात यांच्या विरोधात दाखल झालेले गुन्हे कायम केलेले आहेत.व सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.राजकीय वरदहस्ताने ते अद्याप बीड जिल्ह्यात कार्यरत असुन सध्या ते सत्ताधारी पक्षाचा राजकीय सेवेत असताना प्रचार करीत आहेत.सदर प्रकरणाचे संपुर्ण पुरावे सोबत जोडण्यात आलेले आहेत.जिल्हा शल्यचिकित्सक या महत्त्वाच्या पदावर असतानाही डॉ.अशोक थोरात यांचा राजकीय सहभाग स्पष्ट दिसून येतो.आगामी सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता डॉ.थोरात यांची कृती महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असल्याने आचारसंहितेपुर्वी त्यांची तात्काळ बीड जिल्ह्यबाहेर बदली करून त्यांच्या विरूद्ध नियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती.
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर:-
-----------------------------------------_----
मा.धनंजयजी मुंडे साहेब आता आपण सत्तेत आहात, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड सन्माननीय केबिनेट मंत्री आहात,मग आता डॉ.अशोक थोरातांवर कारवाई का करत नाही आहात ?? तुम्ही सर्व पुरावे निवडणूक आयुक्त यांना दिले आहेत. मग असा गर्भपात प्रकरणी आरोपी जिल्हा शल्यचिकित्सक बीड करांच्या माथी मारून माजी पालकमंत्री सन्माननीय पंकजाताई मुंढे यांनी जी चुक केली होती तीच तुम्ही का करत आहात, बीडकरांना बदनाम का करत आहात. तुम्हाला हा गर्भपातप्रकरणी आरोपीच जिल्हा शल्यचिकित्सक बीड म्हणून का हवाय, ईतर कोणी सुज्ञ वैद्यकीय अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक बीड पदाच्या लायकीचा नाही का???
आपण म्हणालात ते शासकीय सेवेत उच्च पदावर असताना सुद्धा त्यांचा राजकीय सहभाग स्पष्ट दिसुन येतो. मग सध्या ते सत्ताधारी पक्षाचा ( तत्कालिन पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचा भाजपा पक्षाचा) राजकीय प्रचार करताना आपणास दिसून येत होते.मग आता ते सत्ताधारी पक्षाचा म्हणजेच आपल्या आघाडी सरकारचा ( शिवसेना-कांग्रेस-राष्ट्वादी कांग्रेस) चां प्रचार करीत आहेत काय ??कींवा त्यांनी आपल्या पक्षात अधिकृत प्रवेश घेतला आहे काय?? आणि नसेल घेतला तर आपण त्यांच्यावर कारवाई करण्यात दिरंगाई का करत आहात??, वरीष्ठ पातळीवरून पक्षाकडु काही दबाव आहे का?? , पक्षाला डॉ.थोरार यांनी पक्षफंडाकरीता काही तरतुद किंवा आर्थिक सहाय्य केले आहे काय?? कारण तशी बीड जिल्ह्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यात चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे, ज्यामुळे ईतका मनमानी कारभार करून सुद्धा विविध दैनिकातून जसे विभागीय दैनिक सकाळ ,दै. पुण्यनगरी, दै. दिव्यमराठी तसेच स्थानिक दै.पार्श्वभुमी, दैनिक लोकाशा , तसेच सायं दैनिक बीड सिटीझन, बीड रिपोर्टर,दै. बीड सरकार , बीड अभिमान, दै.आदर्श तसेच दै.झुंजारनेताने तर केज उपजिल्हा रुग्णालयातील असुविधे विषयी साप्ताहिक आठवडा विशेष मालिकाच प्रसिद्ध केली होती.तेथिल आमदार नमिता मुंदडा यांनी तर आपण डॉ.अशोक थोरात सांगून देखिल ऐकत नाहीत म्हणुन मा.राजेशजी टोपे, आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांना दि. ०१/०६/२०२० रोजी लेखी तक्रार दाखल केली होती. आता आपण त्या भाजपा आमदार आहेत म्हणुन दुर्लक्ष तर केले नाही ना??? शेवटी आपण बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि केज मतदारसंघ सूद्धा बीड जिल्ह्यातच येतो की म्हणुन नका दुर्लक्ष करू.
डॉ.एकनाथ माले, उपसंचालक, आरोग्य सेवा, परिमंडळ लातुर यांचे म्हणणं तरी ऐकून चर्या
----------------------------------------------- डॉ.एकनाथ माले यांच्याकडे जिल्हा रुग्णालयातील १२ वैद्यकीय अधिकारी यांनी डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक बीड यांच्या मनमानी कारभार विरोधात लेखी तक्रार दाखल केली व चौकशीची मागणी केली. डॉ.एकनाथ माले यांनी चौकशी करण्यासाठी डॉ.दुधाळ के.एच.सहाय्यक संचालक (वै) आरोग्य सेवा लातुर यांची नेमणुक केली. त्यांनी चौकशी करून दिलेला अहवाल पुढील प्रमाणे आहे.
१) बीड जिल्हा रुग्णालयात डोळ्याचा तज्ञ हा विकृतिशास्त्र विभाग प्रमुख केला आहे.माझ्यामते हे चुक आहे.डोळ्याचा तज्ञ हा डोळ्याचा वैद्यकीय अधिकारीच असावा.
२) स्त्रीरोग तज्ञाचा प्रमुख त्वचारोग तज्ञ आहे, हे चुकीचे आहे.संबधित विभागाचा विभागप्रमुख हा त्या विभागातील ज्येष्ठतम अधिकारी असावा.तसेच शस्त्रक्रिया विभागप्रमुख हे वैद्यकिय अधिक्षक,ग्रामिण रूग्णालय रायमोह येथिल आहेत.हे सुद्धा चुकीचे आहे.
३) शासन परिपत्रक दि.२२/०३/२०१२ नुसार ज्या रूग्णालयात २०० पेक्षा जास्त खाटा असतील त्या ठिकाणी वरिष्ठ आधिका-यास डी.एम.ओ.व शवविच्छेदन ड्युटी लावु नयेत. त्याऐवजी आठ (८) कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी निवडावेत व त्यांनी डी.एम.ओ.आणि शवविच्छेदन करावे. परंतु बीड जिल्हा रुग्णालयात आजपर्यंत डी.एम.ओ.व शवविच्छेदन ड्युटी लावली जात आहे.
नेहमीप्रमाणे जिल्हाशल्यचिकित्सक
---------------------------------------------
डॉ.अशोक थोरात चौकशीत दोषी सिद्ध
----------------------------------------------
निष्कर्ष , डॉ.अशोक थोरात शासकीय नियमांची पायमल्ली करत आहेत, त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी.
संदर्भ :-मा.उपसंचालक आ.से.लातुर यांचे पत्र जा.क्र.४३१३१-३३/१९ दि.०१/०१/२०२०
मा.आयुक्त , आरोग्य सेवा तथा अभियान संचालक,रा.आ.अभियान मुंबई यांना दि. ११/०२/२०२० रोजी उसंआसे/४७१६ डॉ.एकनाथ माले उपसंचालक, आरोग्य सेवा लातुर परिमंडळ लातुर यांनी पत्र लिहुन डॉ.दुधाळ के.एच.सहाय्यक संचालक (वै) आ.से.लातुर यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालाशी हे कार्यालय सहमत आहे असे कळवले आहे.
ना.पंकजाताई मुंढे महिला व बालकल्याण मंत्री असताना व खा. प्रितमताई मुंढे या दोघीही महिला असताना केवळ राजकीय कार्यकर्ता म्हणून अल्पवयीन अविवाहित मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीशी गर्भपात केल्याप्रकरणी आरोपी डॉ.अशोक थोरात यांची पाठराखण केली ही बीडकरांसाठी शरमेची गोष्ट आहे.
----------------------------------------------
अशा बदनाम अधिकारी यांना आणि विशेष म्हणजे गर्भपात प्रकरणी न्यायप्रविष्ट असणारा आरोपी आणि केज उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असताना दि. १ जुलै २०१२ रोजी अल्पवयीन, अविवाहित मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीशी संगनमत करून गर्भपात केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्रन्यायालय, अंबेजोगाई येथे दाखल झालेल्या सत्र प्रकरण ८२/२०१३ मध्ये न्यायालयाने दिलेल्या प्रतिकुल शे-यानुसार डॉ.अशोक थोरात व डॉ.प्रतिभा थोरात यांच्या विरूद्ध शिस्तभंग विषयक कार्रवाई सुरू करण्याचा प्रस्ताव दि. १९/०८/२०१५ पत्रानूसार संचालनालयाकडुन मागविण्यात आला असुन याबाबत
दि. ०३/१२/२०१५
दि. ११/०२/२०१६
दि. २०/०४/२०१६ रोजी पत्र पाठवून पाठपुरावा करण्यात आला आहे.अहवाल प्राप्त झाल्यानंतर मा.न्यायालयाचेआदेश विचारात घेऊन कार्यवाही करण्यात येईल.