----------------------------------------------(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) बीड नगरपालिकेने बीड शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध महापुरुषांचे स्मारक असतानाच बीडमध्ये शहराचे वैभव वाढवण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च दाखवून काही चौकामध्ये सुशोभीकरण म्हणुन ज्या वास्तु बांधल्या त्यांची पडझड झाली असून नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे बीड शहराचे वैभव वाढवण्यासाठी कि ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी हा घाट घातला गेला होता असा बीडकरांना प्रश्न पडला आहे.
नगरपालिकेचा बीडकरांना संदेश
------------------------------------------------ नगरपालिकेने सुशोभीकरणाच्या नावाखाली माने कांम्प्लेक्स समोर प्रसिद्ध अशा महात्मा गांधीजींच्या तिन माकडांची प्रतिकृती वाईट पाहू नये,वाईट बोलू नये आणि वाईट ऐकु नये असा संदेश देणारा आहे. प्रत्यक्षात मात्र बीड नगरपालिकेने या पुतळ्याच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे संदेश बीडकरांना दिला कि काय असा बीडकरांचा पडलेला प्रश्न आहे
डोळ्यावर हात ठेवून वाईट पाहू नये
--------------------------------------------
बीड शहरांमध्ये महापुरुषांच्या स्मारकांची दुरावस्था याकडे डोळेझाक करावी, बीड शहरातील राष्ट्रीय महामार्ग व शहरांतर्गत रस्त्यांची दुरवस्था, जागोजागी पडलेले खड्डे पाहु नये, ठिकठिकाणी कचरा ,अस्वच्छता पाहु नये
तोंडावर हात ठेवून वाईट बोलू नये
----------------------------------------------- गेली ४० वर्ष नगरपालिका एकाच घराण्याच्या ताब्यात आहे. दरवर्षी लाखो रुपये नगरपालिका बीड शहरांच्या विकासासाठी निधि खर्च झाल्याचे दाखवुन ठेकेदार नगरसेवकांचे माध्यमातून ,निधीची लुटमार होते याविषयी बोलु नये.
कानावर हात ठेवून वाईट ऐकु नये
----------------------------------------------- वर्षोनवर्षे नगरपालिकेच्या सत्तेवर विराजमान असणा-या नगराध्यक्षां बद्दल नागरीकांनी सामाजिक कार्यकर्ते अथवा विविध प्रसिद्ध माध्यमांनी नगरपालिकेच्या गैरकारभाराच्या पुराव्यासह आलेल्या प्रकरणांचा कितीही बोभाटा केला तरी कानावर हात ठेवून ऐकु नये.
वरील ३ गोष्टींचा संदेश बीडकरांना देण्यासाठीच कदाचित हे स्मारक उभारले असेल.