नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता दिनांक 26/06/2020 29 जून ते 5 जुलै या कालावधीत 10 मोठ्या भागांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र घोषित

[21:17, 26/06/2020] Dainik Lokankit: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करीत महापालिका आयुक्त श्री . अण्णासाहेब मिसाळ यांनी मागील पंधरा दिवसात ज्या भागांमध्ये जास्त प्रमाणात कोरोना बाधित सापडले आहेत अशा कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या 10 मोठ्या क्षेत्रांना 29 जून ते 5 जुलै 2020 या कालावधीकरिता प्रतिबंधित क्षेत्र ( Containment Zone ) म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत . सदर प्रतिबंधित क्षेत्रामध्ये या कालावधीत पूर्णत : लॉकडाऊन पाळण्यात येणार असून या क्षेत्राबाहेर नागरिकांना वैद्यकीय अथवा अत्यावश्यक कामाखेरीज बाहेर येणे - जाणे यावर प्रतिबंध असणार आहे . त्याचप्रमाणे महत्वाचे म्हणजे या प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी जाऊन महानगरपालिकेमार्फत मास स्क्रिनींग मोहिम राबविण्यात येणार असून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे . सदर 10 मोठ्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ( Containment Zone ) बेलापूर विभाग कार्यक्षेत्रातील दिवाळेगांव , करावेगांव तसेच तुर्भे विभाग कार्यक्षेत्रातील तुर्भे स्टोअर , सेक्टर -21 तुर्भे व सेक्टर -22 तुर्भे गांव यांचा समावेश आहे . त्याचप्रमाणे वाशी विभाग कार्यक्षेत्रातील सेक्टर -11 जुहूगाव तसेच कोपरखैरणे विभाग कार्यक्षेत्रातील सेक्टर -12 खैरणे बोनकोडे गांव , सेक्टर -19 कोपरखैरणे गांव येथेही प्रतिबंधित क्षेत्र असणार आहे . त्यासोबतच घणसोली विभाग कार्यक्षेत्रातील राबाडे गांव आणि ऐरोली विभाग कार्यक्षेत्रातील चिंचपाडा हे देखील प्रतिबंधित क्षेत्र ( Containment Zone ) म्हणून घोषित करण्यात आले आहे . नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकूण 10 मोठ्या भागांमध्ये 29 जून ते 5 जुलै 2020 या कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र ( Containment Zone ) घोषित करण्यात येत असून नागरिकांनी या कालावधीत आपल्या घरातच थांबावे व 28 जूनपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा 5 जुलैपर्यंत पुरेल इतका साठा घरात करून ठेवावा व कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री . अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे .