पनवेल दि.30 जून 2020
पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रकोप वाढत असताना कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील सर्वेक्षण करणे हे आवश्यक ठरते. यासाठी महानगरपालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेचे शाळांतील शिक्षक कर्मचारी यांची नेमणूक केली होती. पनवेल मनपाचे सर्वच कर्मचारी मागील मार्च 2020 पासून सतत काम करत आहेत. मात्र संसर्ग वाढल्याने व कर्मचारी कमी असल्याने शेवटी रा.जि.प.चे कर्मचारी सर्वेक्षणकामी घेण्यात आले. यातील बरेच कर्मचारी गैरहजर राहत असल्याने त्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. यातील गैरहजर कर्मचा-यांना गुन्हे दाखल करण्यापूर्वी दंड लावण्यात आला आहे. भविष्यात कोणी गैरहजर राहिल्यास त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत.
मनपा हद्दीतील राजिप शाळांचे एकूण शिक्षक 323 आहेत. यापैकी 55 वर्षे वय व आजारपण व विविध कारणांमुळे 221 शिक्षक आले नाहीत. त्यांच्या रजा खर्ची टाकण्यात येत आहेत. उर्वरित पैकी एकुण शिक्षक 103 आले होते. त्यातीलही
गैरहजर राहिलेले शिक्षक 76 आहेत.
त्यांना आता रूपये 500 प्रत्येकी दंड आकारण्यात येत आहे.
त्याचे विवरण खालीलप्रमाणे आहे.
UPHC पनवेल2 कार्यरत शिक्षक 12
गैरहजर 12
UPHC कळंबोली
कार्यरत शिक्षक 26
गैरहजर 20
UPHCनवीन पनवेल
कार्यरत शिक्षक 34
गैरहजर 28
खारघर UPHC कार्यरत शिक्षक 18
गैरहजर 14
कामोठे UPHC कार्यरत शिक्षक 14
गैरहजर 2
यापुढे कोणी कर्तव्यात कसूर केल्यास त्यांचेवर साथरोग अधिनियम 1897 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत अशी माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे.