बीडकर उघडा डोळे बघा नीट भाग- ३ नगराध्यक्ष साहेब पुन्हा रस्ता दुरूस्तीचे कुरण चरण्यासाठी खुले होणार, विकासकामाच्या नावाखाली थातुरमातुर काम करतात :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


------------------------------------------------ (बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)बीड जिल्ह्यायाचे भुषण आदरणीय नगराध्यक्ष साहेब आता पावसाळ्यात मान्सुनपुर्व स्वछ्तेची कामे केली म्हणुन मोठा निधी कागदोपत्री खर्च झाला दाखवुन नगरसेवकांची पोटापाण्याची व्यवस्था केली जाईल.


महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगपशरपालिका यांची चिखलफेक
,-------------------------------------------_--- बीड शहरातुन जाणारे दोन राष्ट्रीय महामार्ग आणि शहरांतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, मोठमोठाले खड्डे पडले आहेत. आता हे खड्डे कोण बुजवणार यावर काथ्याकुट होईल, महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगपशरपालिका यांचे एकमेंकांवर दोषारोपन होईल.एकमेकांवर शाब्दिक चकमक सुरू होईल,. बेरोजगार नेत्यांच्या समर्थक आणि विरोधक लोकांना वाटसअप माध्यमातून रोजगार मिळेल.


खड्डे दुरुस्ती म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण, थातुरमातुर काम केलंय दाखवून रोजगार हमी भत्ते सुरू होतील.
ता
----------------------------------------------


पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्ग व शहरांतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे मोठमोठाले खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात आणखी दयनीय अवस्था होणार आणि महामार्ग व शहरांतर्गत रस्त्यांची देखभाल अथवा विकास कामे या गोंडस नावाखाली नगरपालिका आपल्या नगरसेवकांच्या पोटापाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.आणि काळीमाती अथवा कच्चा मुरूम टाकला जाईल,मग आणखी चिखल होईल. दुचाकी वाहने घसरतील,काही दवाखान्यात जायच्या लायकिचे राहतील,तर काहींना परमेश्वर आपल्या जवळ बोलावून घेईल.


महापुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी निमित्त हार घालताना सभोवताली खड्डे,दिसत नाहीत का???
------------------------------------------------छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला कायमच काही ना काही निमित्ताने अथवा जयंती पुण्यतिथी निमित्त हार घालून त्यांचे फोटो सोशल मीडिया वर पोस्ट करताना यांना खड्डे दिसत नाही का???? विरोधी पक्षनेते म्हणुन काम करणारे या संबधि मुग गिळून गप्प का आहेत हा बीडकरांना  पडलेला प्रश्न आहे