प्रतिनिधी उरण : GTI च्या मुजोर व्यवस्थापनास वारंवार पत्र व्यवहार व मागणी करून सुद्धा चायना कंत्राट रद्द करण्यास चाल ढकल करत आहेत . याचा निषेध करण्यासाठी सोमवार दिनांक २ ९ जून रोजी GTI कंपनीच्या गेटवर सर्व कामगार संघटनांच्या वतीने निदर्शन करण्यात आले . सुरुवातीस गलवान येथे हुतात्मा झालेल्या भारतीय सैनिकांना श्रध्दांजली अर्पन करण्यात आली . त्यानंतर चिनचा ध्वज जाळून निषेध करण्यात आला . सारा देश चिनवर बहीष्कार टाकत असताना मदमस्त GTI व्यवस्थापनाने ZPMC हया चायना कंत्राटदाराला क्रेन मेटेंनन्सचे काम दिले आहे हे लांच्छनास्पद आहे , आपल्या देशाच्या अस्मीतेचा प्रश्न आहे . GT | व्यवस्थापनाने तात्काळ चायना कंत्राट रद्द केले नाही तर उरण मधील सर्व कामगार संघटना व सर्व पक्षिय संघर्ष समिती GT | च्या गेटवर उग्र आदोलन करून कंपनीचे कामकाज बंद पाडेल असा सज्जड दम कामगार नेते श्री . महेंद्र घरत यांनी यावेळी दिला . यावेळी न्यु मेरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे पि.के.रामण , वैभव पाटील , संजय ठाकूर , मुरलीधर ठाकूर , आदिनाथ भोईर , आनंद ठाकूर , आकाश ठाकूर , विवेक म्हात्रे , आदीत्य घरत , अमोल ठाकूर , श्रीधर कवडे , गलांडे , समीम तसेच शिवतेज संघटनेचे महेंद्र सावंत त्याच बरोबर GTI चे कामगार संतोष भोपी , अमित , प्रतीक , अजय , सतिश , व इतर कामगार उपस्थित होते .