GTI मधील चायना कंत्राट रद्द झालेच पाहिजे सर्वपक्षिय बैठकित महेंद्र घरत यांची मागणी

. सपूर्ण देश चायना उत्पादनावर बहीष्कार टाकत आहे . तसेच चायना कंपन्यांना दिलेले कंत्राट रद्द करत आहे . असे असताना GTI व्यवस्थापन १ जुलै २०२० पासुन ZPMC या चायना कंत्राटदाराला केन मेंटेनन्सचे काम देत आहे . या विरोधात कामगार नेते महेंद्रजी घरत यांनी देशाचे पंतप्रधान श्री . नरेद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री . उध्दवजी ठाकरे यांना पत्राव्दारे कंत्राट रद्द करण्यासाठी मागणी केलेली आहे . GTI प्रशासनाच्या या आडमुठी धोरणा आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी श्री . महेंद्र घरत यांच्या उरण कार्यालयात माजी आमदार मनोहर भोईर , कामगार नेते भुषण पाटील व GTI कामगार तसेच स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली . आधीच कोरोनामुळे देशाची आर्थिक परीस्थीता खालावली आहे . देशाच्या अस्मीतेचा प्रश्न निर्माण झाला आहे . आपल्या २० सैनिकांना चिन सिमेवर हौतात्म पत्करावे लागले . आपला उरण तालुका ही हुतात्मांची जन्मभुमी आहे . आपल्याला सत्याग्रह , आदोलनांचा इतिहास आहे . त्यामुळे या आंदोलनात सुद्धा सर्व कामगार व नागरिक सहभागी घोवुन चायना कंत्राट रद्द करून हुतात्यांचे रक्त वाया जात नाही , जावु दयायचे नाही . असे आवाहन महेंद्र घरत यांनी केली . या बैठकिसाठी माजी आमदार मनोहर भोईर , इंटकचे राष्ट्रीय सचिव श्री . महेंद्र घरत , कामगार नेते भुषण पाटील , पि . के . रामण , वैभव पाटील , विनोद म्हात्रे , जयवंत पाटील , किरीट पाटील , परशुराम भोईर , संजय ठाकूर , श्री . सावंत , आदिनाथ भोईर , आशिष तांडेल , विवेक म्हात्रे , तसेच GTI मधील कामगार उपस्थीत होते .