हिंगोली #सोमठाण बौद्ध वस्ती हल्ल्याप्रकरणी अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरवेळी प्रमाणे पोलिसांना जातीतवादी गुंडांची जास्त काळजी दिसली. त्या विभागातील राजकीय जातीतवाद्यांनी या प्रकरणात दबाव आणलेला दिसतो. डोकी फुटलीत, पीडित रक्तबंबाळ झालेत मात्र 307 कलम दाखल केलेलं नाही. अट्रोसिटी ऍक्ट मध्ये इजा, गंभीर इजासाठी अट्रोसिटी ऍक्टमध्ये जी तरतुद आहे ती 3(2)5ए सुद्धा लावलेले नाही. काल सुद्धा सावरखेडा पोलीस स्टेशनने सुरवातीला 3(1)r लावलं होतं परंतु कार्यकर्ते आम्ही सगळ्यानी दबाव कायम ठेवला म्हणून त्यात गंभीर कलम दाखल करू शकलो.
रात्री सोमठाणा प्रकरणी कार्यकर्त्यानी 307 चा आग्रह धरला परंतु जे करायचं तेच केलं. जोपर्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे जातीयवाद्यांवर दाखल होत नाहीत. तो पर्यंत कायद्याचा धाक निर्माण होणार नाही. जातीयवादी हा एक आतंकवादीच आहे त्यामुळे त्याला आतंकवाध्यासारखच यंत्रणेने ट्रीट केले पाहिजे.
सोमठाणा प्रकरणी सर्व आरोपींनी तात्काळ अटक करण्यात यावी. हिंगोली जिल्ह्यातील संवेदनशील गावातील बौद्ध वस्त्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. पीडितांवर बहिष्काराची शक्यता नाकारता येत नाही त्यांना समाजकल्याण विभागाने तात्काळ मदत करावी.
हिंगोली जिल्ह्यातील सावरखेडा, सोमठाणा या दोन गावात सध्या सीआरपीएफ तैनात आहे परंतु महाराष्ट्राच्या मिडीयाला खबर नाही, गृहमंत्री एक ट्विट करायला तयार नाहीत, हिंगोली जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा खासदार आहे परन्तु ते ही यावर बोलायला तयार नाहीत.
या असंवेदनशील सरकारचा ऑल इंडिया पँथर सेना जाहीर निषेध करीत आहे. मुर्दाड जातीयवादी मीडियाचा धिक्कार करते.
आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आणि जातीयतेमुळे दोन गावात बौद्ध वस्त्यावर हल्ले, सीआरपीएफ तैनात किती दुर्दैवी चित्र आहे. शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्या अनुयायांवर हल्ले सुरू आहेत. शाहू महाराजांना या सरकारच अभिवादन!