लिंबागणेश ते काटवटेवस्ती  रस्ता तात्काळ करण्यासाठी पुन्हा रास्ता रोको आंदोलन:- डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर


-----------------------------------------------(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)   बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश ते काटवटे वस्ती ते अंजनवती हा टेंडर प्रमाणे करण्यात यावा यासाठी. दि. १२मार्च रोजी डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते तेव्हा तहसिलदार कीरण आंबेकर यांनी निवेदन स्विकारत रस्ता करण्यात येईल असे आश्वासन दिले होते परंतु ते न पाळल्यामुळे पुन्हा एकदा ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


सुनिल येडे :- सरपंच अंजनवती
------------------------------------------------ लिंबागणेश ते काटवटे वस्ती ते अंजनवती ते घारगांव ते चौसाळा असा प्रस्तावित टेंडरप्रमाणे रस्ता करण्यात यावा यासाठी दि. २१/११/२०१९ रोजी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था बीड यांना लेखी निवेदन दिले होते.तर दि. २६/०१/२०२० रोजी पालकमंत्री धनंजयजी मुंडे, आ.संदिपभैय्या क्षीरसागर, जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता ही.एम.जी.एस. वार.बीड   यांना निवेदन दिले होते. त्यानंतर दि. १२ मार्च रोजी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश बसस्थानक येथे मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते, त्यावेळी तहसिलदार कीरण आंबेकर यांनी तात्काळ रस्ता टेंडर प्रमाणेच करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.


पांडूरंग वाणी / संजय घोलप/आरुण ढवळे, किसन नाईगडे, बापु थोरात
---------------------------------------------


लिंबागणेश ते काटवटे वस्ती मार्गावरच आमची शेती व कोटे आहेत, आम्हाला याच रस्त्यावरून जावे लागते. रस्ता अत्यंत खराब असुन पुलावरील नळकांडी पाईप फुटलेला आहे. अंधारात अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी तात्काळ रस्ताकाम पुर्ण करावे.


डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर:-
-----------------------------------------------. मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था बीड मार्फत लिंबागणेश ते काटवटे वस्ती ते अंजनवती ते घारगांव ते चौसाळा असा  ६.८ कि.मी. रस्ता अंदाजे किंमत ४ कोटी ८७ लाख रुपये किंमतीचा असुन टेंडरप्रमाणे करण्यात यावा यासाठी दि. १२ मार्च रोजी लिंबागणेश बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते, तहसिलदार आंबेकर यांनी मागणी पूर्ण करत संबंधितांना नोटीस बजावण्याचे आश्र्वासन दिले होते.परंतु अद्याप रस्ता न केल्यामुळे तसेच पावसाळ्यात माणसे व जनावरांचे हाल होत असल्यामुळे ग्रामस्थांनी रस्त्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.