प्रासंगिक संविधान खिल्ली उडवू नका संविधान बनलं.त्यानंतर लोकं संविधानानुसार चालायला लागले.वागायला लागले.जे वागत नव्हते,त्यांना शिक्षा व्हायला लागल्या.त्यामुळे साहजिकच संविधानाच्या कलमांचा धाक बसला. संविधान ज्याप्रमाणे बनलं.त्यानुसार शिक्षा देतांना न्यायालयानं त्यातील कलमांचा वापर केला.परंतू याच कलमांचा वापर करीत असतांना लोकांमध्ये जो उत्साह होता.त्या उत्साहाचं परिमार्जन म्हणजे काही लोकं आततायीपणानं वागू लागले.अर्थात संविधानाचा वापर करुन दुस-यांना त्रास देवू लागले.जसे स्रियांवर जो अत्याचार होत होता.त्या अत्याचाराला रोखण्यासाठी आ.बाबासाहेबांनी कलम ४९८ ब व १२५ अ बनवली.याचा लाभ अत्याचार ग्रस्त महिलांना झाला.पण पुढील काळात काही स्रीयांनी याचाच लाभ उचलीत ज्या पुरुषांचा गुन्हा नसायचा.त्यांनाही ४९८ ब अंतर्गत तुरुंगात टाकले.तसेच कलम १२५ अ अंतर्गत जबरदस्तीनं खावट्या वसूल केल्या.हेच शिक्षकांच्या बाबतीत घडलं.शिक्षकांच्या बाबतीतही १२५ अ ही संचालकाच्या बाजूची कलम होती.शिक्षकांची कर्दनकाळच.कारण त्यावेळी शिक्षक शाळेत काम करायला टिकत नसत.त्यामुळे त्यांना टिकविण्यासाठी ही कलम होती.परंतू काळानुसार ही कलम कालबाह्य ठरली. आ.बाबासाहेब आंबेडकर हे दुरदर्शी स्वभावाचे होते.त्यांना भविष्यात काय होणार यांची जाणीव असल्यानं त्यांनी संविधानात त्या त्या कलमा अंतर्भूत केल्या.पण आज काही काही कलमांची गरज आपल्याला नाही.त्यामुळं संविधानातील काही कलमात नक्कीच सुधार करण्याची गरज आहे.भारताची राज्यघटना ही परीवर्तनशील आहे.पण ती एवढीही परीवर्तनशील नाही की हवे तेव्हा बदल करता येईल.एखाद्या कलमावर बदल करायचा असल्यास केवळ राजकारणीच बदल करवू शकतात.ते त्या कलमावर संसदेत चर्चा करतात.त्यावर बहुमत घेतात.राज्यसभेतून व लोकसभोतून ते पास करुन मग राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवावे लागते.मगच ती कलम बदलवता येते.पण राजकारणी काही तसं करीत नाही.त्यांना जनतेचं मत माहित नसतं.अन् माहित ही असलं तरी ते असा बदलाव करीत नाहीत.कारण ते आपल्या मतासाठी जनतेत राजकारण करतात.बदलाव केला तरी नुकसान व नाही केला तरी नुकसानच.यामुळं संविधानातील कलमांची जैसे थे स्थिती असते.कोणालाच राग लोभ नाही.सारेच खुश.यामुळं त्यांना त्या त्या कलमांचा त्रास आहे.ती मंडळी मात्र दुःखी राहतात व ते या संविधानाची खिल्ली उडवतात.हीच वास्तवता आहे. मुख्य म्हणजे संविधानाची कोणीही खिल्ली उडवू नये.यात संविधानाची चूक नाही.बाबासाहेबाचीही चूक नाही.चूक आहे विद्यमान राबवणा-या यंत्रणेतील लोकांची.त्यांनी हव्या त्या परिस्थिती नुसार बदलाव करायला हवा.पण तसा बदलाव न होत असल्यानं समस्या आहे. संविधान मोठ्या मेहनतीनं तयार केलेली वस्तू आहे.आपल्या देशाचा आधार आहे.जर आपण त्याची खिल्ली उडवली तर लोकं अनाचारासारखे वागायला लागतील.देशात अस्थिरता माजेल व अख्खा देशच देशोधडीला जाईल.आज आपल्या संविधानाचा अभ्यास इतर देशात केला जातो.हे विसरु नये.तेव्हा संविधानाला दोष देवून उपयोग नाही.हं,एक मात्र निश्चित करा मनामध्ये की संविधानातील कलमा जरी तुमच्या मनालायक नसतील.तर तुम्ही स्वतःला बदसवून घ्यायला हवं आहे त्या परीस्थीतीत स्वतःला समायोजीत करुन घ्यावं.जेणेकरुन संविधानाचा त्रास तुम्हाला होणार नाही.संविधानही अबाधीत राहील.त्याची कोणी खिल्ली उडविणार नाही.तसेच देशात अस्थिरता ही माजणार नाही. अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२ Sent from OPPO Mail





प्रासंगिक
संविधान खिल्ली उडवू नका

          संविधान बनलं.त्यानंतर लोकं संविधानानुसार चालायला लागले.वागायला लागले.जे वागत नव्हते,त्यांना शिक्षा व्हायला लागल्या.त्यामुळे साहजिकच संविधानाच्या कलमांचा धाक बसला.
        संविधान ज्याप्रमाणे बनलं.त्यानुसार शिक्षा देतांना न्यायालयानं त्यातील कलमांचा वापर केला.परंतू याच कलमांचा वापर करीत असतांना लोकांमध्ये जो उत्साह होता.त्या उत्साहाचं परिमार्जन म्हणजे काही लोकं आततायीपणानं वागू लागले.अर्थात संविधानाचा वापर करुन दुस-यांना त्रास देवू लागले.जसे स्रियांवर जो अत्याचार होत होता.त्या अत्याचाराला रोखण्यासाठी आ.बाबासाहेबांनी कलम ४९८ ब व १२५ अ बनवली.याचा लाभ अत्याचार ग्रस्त महिलांना झाला.पण पुढील काळात काही स्रीयांनी याचाच लाभ उचलीत ज्या पुरुषांचा गुन्हा नसायचा.त्यांनाही ४९८ ब अंतर्गत तुरुंगात टाकले.तसेच कलम १२५ अ अंतर्गत जबरदस्तीनं खावट्या वसूल केल्या.हेच शिक्षकांच्या बाबतीत घडलं.शिक्षकांच्या बाबतीतही १२५ अ ही संचालकाच्या बाजूची कलम होती.शिक्षकांची कर्दनकाळच.कारण त्यावेळी शिक्षक शाळेत काम करायला टिकत नसत.त्यामुळे त्यांना टिकविण्यासाठी ही कलम होती.परंतू काळानुसार ही कलम कालबाह्य ठरली.
          आ.बाबासाहेब आंबेडकर हे दुरदर्शी स्वभावाचे होते.त्यांना भविष्यात काय होणार यांची जाणीव असल्यानं त्यांनी संविधानात त्या त्या कलमा अंतर्भूत केल्या.पण आज काही काही कलमांची गरज आपल्याला नाही.त्यामुळं संविधानातील काही कलमात नक्कीच सुधार करण्याची गरज आहे.भारताची राज्यघटना ही परीवर्तनशील आहे.पण ती एवढीही परीवर्तनशील नाही की हवे तेव्हा बदल करता येईल.एखाद्या कलमावर बदल करायचा असल्यास केवळ राजकारणीच बदल करवू शकतात.ते त्या कलमावर संसदेत चर्चा करतात.त्यावर बहुमत घेतात.राज्यसभेतून व लोकसभोतून ते पास करुन मग राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवावे लागते.मगच ती कलम बदलवता येते.पण राजकारणी काही तसं करीत नाही.त्यांना जनतेचं मत माहित नसतं.अन् माहित ही असलं तरी ते असा बदलाव करीत नाहीत.कारण ते आपल्या मतासाठी जनतेत राजकारण करतात.बदलाव केला तरी नुकसान व नाही केला तरी नुकसानच.यामुळं संविधानातील कलमांची जैसे थे स्थिती असते.कोणालाच राग लोभ नाही.सारेच खुश.यामुळं त्यांना त्या त्या कलमांचा त्रास आहे.ती मंडळी मात्र दुःखी राहतात व ते या संविधानाची खिल्ली उडवतात.हीच वास्तवता आहे.
           मुख्य म्हणजे संविधानाची कोणीही खिल्ली उडवू नये.यात संविधानाची चूक नाही.बाबासाहेबाचीही चूक नाही.चूक आहे विद्यमान राबवणा-या यंत्रणेतील लोकांची.त्यांनी हव्या त्या परिस्थिती नुसार बदलाव करायला हवा.पण तसा बदलाव न होत असल्यानं समस्या आहे.
         संविधान मोठ्या मेहनतीनं तयार केलेली वस्तू आहे.आपल्या देशाचा आधार आहे.जर आपण त्याची खिल्ली उडवली तर लोकं अनाचारासारखे वागायला लागतील.देशात अस्थिरता माजेल व अख्खा देशच देशोधडीला जाईल.आज आपल्या संविधानाचा अभ्यास इतर देशात केला जातो.हे विसरु नये.तेव्हा संविधानाला दोष देवून उपयोग नाही.हं,एक मात्र निश्चित करा मनामध्ये की संविधानातील कलमा  जरी तुमच्या मनालायक नसतील.तर तुम्ही स्वतःला बदसवून घ्यायला हवं आहे त्या परीस्थीतीत स्वतःला समायोजीत करुन घ्यावं.जेणेकरुन संविधानाचा त्रास तुम्हाला होणार नाही.संविधानही अबाधीत राहील.त्याची कोणी खिल्ली उडविणार नाही.तसेच देशात अस्थिरता ही माजणार नाही.

    अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२

 

 

Sent from OPPO Mail