वादळीवाऱ्यासह पावसात झोपडीत राहुन एक महिन्यांची बाळंतीण असुन विहीर फोडणा-या वडरी समाजाच्या मिना शिंदेची व्यथा ऐकून शासनकर्त्यांच्या हद्याला पाझर फुटेल काय???:- डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर


----------------------------------------------
सविस्तर माहितीसाठी:- स्वत:चे गाव सोडून पोटापाण्यासाठी भटकंती करत विहीर फोडण्याचे काम करणा-या कष्टकरी वडरी समाजाच्या वादळीवाऱ्यासह १ महिन्याच्या मुलाला कोपीत घेऊन विहीर फोडण्याचे काम करणा-या मिना शिंदे हीची पोटापाण्यासाठी करावं लागतं ही व्यथा ऐकून शासनकर्त्यांच्या काळजाला पाझर फुटेल काय? असा प्रश्न डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर यांना पडला आहे.


अविनाश गायकवाड
---------------------------------------------
आमचं गाव चौसाळा , शिक्षण नाही, बापजाद्यांपासून विहीर फोडणे हाच आमचा धंदा. विहिर फोडण्यासाठी गुत्ते घेतोय,मुलाबाळांसह राबावं लागतं, बारा महिने हाच व्यवसाय आहे.


मीना शिंदे:- एक महिन्याची बाळंतीण
----------------------------------------------- बाळंतीण होऊन एक महीना झाले, वादळीवाऱ्यासह पावसात या मेणकापड हाथरलेल्या कोपी मध्ये राहतोय. गडी माणसांची जेवणाखाणाची सोय आणि पोटापाण्यासाठी काम करण्याशिवाय
इलाज नाही, मग सडी काय आणि महिन्याची बाळंतीण काय ???आम्हाला सगळं सारखंच


मला चार मुलं हाईत, तिकडं आश्रमशाळेत टाकलेत शिकायला,पण आता कोराना महामारी मुळे गावाकडे आणलेत.आता आम्हीच गावावर नाहीत, मग आमी कामाला जिकडं जाईन पोरं बी तिकडंच.


डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर :-
----------------------------------------------- स्वत:चं गाव सोडून पोटापाण्यासाठी भटकंती करत विहीरीतील खडक फोडणा-या वडरी समाजामध्ये अज्ञान आणि शिक्षणाविषयी अनास्था या गोष्टींमुळे समाज मागे पडला आहे, बापजाद्यांचा व्यवसाय म्हणून तोच पाचविला पुजलेला तोच आपण करायल हवा हा गैरसमज.आणि कोणाचेही सरकार आले तरी आपल्या समाजाकडे दुर्लक्षित केलं जातं आणि सरकार दरबारी अधिकारी, कर्मचारी यांना पैसे चारल्याशिवाय कोणतंच काम होत नाही,हे अनुभवातून आलेलं शहाणपण त्यांच्या शासनाप्रति असलेल्या आस्थेची व्यथा व्यक्त करण्यास पुरेशी होती. निदान १ महिन्याच्या बाळासह वादळीवाऱ्यासह पावसाळ्यात झोपडीत राहुन काम करणा-या महिलेची व्यथा ऐकून तरी शासनकर्ती जमात यांच्या काळजाला पाझर फुटेल काय?? हा मला पडलेला प्रश्न आहे.


डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.९४२००२७५७६