थेट नगरसेवक, नागरिकांशी संवाद पालिका आयुक्तांनी केली वागळेची पाहणी : तात्काळ निर्णयावर भर


 


ठाणे (२६स्थानिक नगरसेवकनागरिक यांच्याशी थेट संवाद साधत महापालिका आयुक्त  विपीन शर्मा यांनी आज वागळे प्रभाग समितीचा दौरा केलाया दौ-यामध्ये स्थायी समिती सभापती राम रेपाळेस्थानिक नगरसेविका सौसुखदा संजय मोरेदिपक वेतकरमाजी महापौर संजय मोरेउप आयुक्त संदीप माळवीअशोक बुरपल्लेसहाआयुक्त विजकुमार जाधवकार्यकारी अभियंता श्रीधुमाळ आदी उपस्थित होते.


      महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष प्रभाग समिती स्तरावर भेटी देवून कामाचा आढावा घ्यायला सुरूवात केली आहेआज महापालिका आयुक्तांनी डिसुझावाडी येथील सार्वजनिक शौचालयची पाहणी केलीत्यानंतर शिवाजीनगरसाई मंदीरहिरामोती भाजी मार्केट परिसराची पाहणी केली.


      त्यानंतर डॅाशर्मा यांनी पडवळनगर येथील फिव्हर क्लिनिकला भेट देवून तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केलीत्याचबरोबर त्यांनी नगरसेवकांशीही संवाद साधून कोरोना कोवीड 19 शी लढा देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करण्याची ग्वाही दिली.


      या दौऱ्याच्या माध्यमातून महापालिका आयुक्तांनी नगरसेवक आणि नागरिक यांच्याशी थेट संवाद साधण्याबरोबरच तात्काळ निर्णयावर भर आहे.



 



 


फोटो ओळ


1.  डिसुझा नगर येथील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करताना महापालिका आयुक्त डॅाविपीन शर्मा.


2.  महापालिका आयुक्तांनी वागळे प्रभाग समितीतंर्गत विविध परिसराची पाहणी केलीयावेळी त्यांच्यासमवेत स्थायी समिती सभापती राम रेपाळेनगरसेवक दिपक वेतकरनगरसेविका सौसुखदा मोरेमाजी महापौर संजय मोरे आदी उपस्थित होते.