बीड (प्रतिनिधी) बीड तालुक्याचे भूषण, समाजसेवक, माजी सैनिक अनुरोध वीर यांनी भारतमातेच्या सेवेसाठी गेली (21)एकवीस वर्षे अहोरात्र आपल्या जिवाची पर्वा न करता सेवा केली आहे. देशाच्या संरक्षणासाठी यांनी अनेक मोठ्या कारवाया जम्मू-काश्मीर सारख्या अति संवेदनशील क्षेत्रामध्ये पार पाडले आहे, अनेक आतंकवाद्यांना कंठस्नान घातले आहे, सैनिकांच्या अनेक व आवश्यक प्रश्नांना आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्राच्या सभागृहांमध्ये असा एखादा माजी सैनिक असणे खूप आवश्यक आहे. म्हणून अनुरथ वीर यांना राज्यपाल कोटातून आमदार म्हणून निवडने खूप गरजेचे आहे, बीड तालुका जिल्हा राज्यात जनसेवा करण्याचा वसा त्यांनी अंगीकृत केलेला आहे.
देशाची सेवा करताना अनेक अडचणींचा सामना त्यांनी केला आहे बॉर्डर वरच्या सैनिकांना कोणत्या प्रकारच्या अडचणी आहेत त्या त्यांनी त्यांच्या 21 वर्षाच्या कार्यकाळात मध्ये मोठ्या प्रमाणात अनुभवले आहेत त्या सोडविण्यासाठी या अनुभवी व्यक्तींना महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये निश्चितपणे सहभागी करून घेणे शासनाच्या व प्रशासनाच्या फायद्याची ठरला असं वाटतं.
ते निवृत्त झाल्या पासून मुक्काम पोस्ट पाली तालुका जिल्हा बीड या आपल्या गावी आल्यानंतर त्यांनी गावातील चाळीस-पन्नास मुलांना सैनिकी व पोलिस भरतीचे प्रशिक्षण देत, गाव तंटामुक्त, स्वच्छता ,आरोग्य, गुन्हेगारीमुक्त, गावासह ,तालुका करण्याचा प्रयत्न चालू आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ते पाली येथे समुपदेशन केंद्र, शेती ,शेतीपूरक जोडधंदा याचे प्रशिक्षणही चालू लवकरच करणार आहेत. सुशिक्षित बेरोजगारां साठी ए एस पि इंटरप्राईजेस माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व सुशिक्षित बेरोजगारांसाठी सेक्युरिटी एजन्सी चालू केली आहे, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे माजी सैनिक अनुरथ वीर यांना समाजकार्य, देशसेवा, राज्यपाल यांच्या शासकीय कोट्यातून आमदारकी देण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक(बाबा)कुचेकर,प्रकाश ढोकञे,आमोल जावळे,गणेश चव्हाण, रोहत जावळे,देवेद्रं आहीरे,प्रेम तुपारे ,शंकर रूपवते ,बापु काळे,प्रताप सांळुके,मंहेद्र सोनवणे यानी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.