बीड लोकप्रतिनिंचा अजब कारभार , गर्भपातातील आरोपी डॉ.अशोक थोरात यांना अभय तर कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर जीव धोक्यात घालून बीडकरांचे रक्षण करणा-या कोरोना योद्धयांच्या बदलीचा घाट, रसत्यावर उतरून आंदोलन करणार :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


-----------------------------------------------(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) बीड जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी हे पंचायत समिती बीड मधिल कोटयावधी रुपयांचा घोटाळा दडपण्यासाठी बीड जिल्ह्यातील खरेखुरे कोरोना योद्धा म्हणावे लागतील असे
१) मा. राहुलजी रेखावार साहेब
कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी बीड
२) मा. हर्ष पोद्दार साहेब
पोलिस अधीक्षक बीड
३) मा.अजितजी कुंभार साहेब
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड 
यांच्या बदलीसाठी आग्रही भुमिका घेऊन
 मुख्यमंत्री, पालकमंत्री मुंडे साहेब यांच्याकडे ठाण मांडून बसल्याचे वर्तमानपत्रांमधुन समजले.
जे कोणी प्रशासकीय अधिकारी बीड जिल्ह्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोरोना विषाणुच्या संसर्गापासून बीड जिल्ह्यातील नागरीकांचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी दिवसरात्र प्रामाणीकपणे मेहनत घेतली आहे. जे निष्कलंक चारित्र्यवान आहेत. त्यांच्या बदलीचा घाट आपण घालत असाल तर ही तुमची शेवटची आमदारकी समजा. कारण असले नतद्रष्ट लोकप्रतिनिधी बीड जिल्ह्यातील जनतेला आणि सामाजिक कार्यकर्ते यांना नको आहेत.  याच वेळी ना.धनंजय मुंडे, पालकमंत्री बीड यांनी निवडणूक आयोगाला पुराव्यानिशी गंभीर आरोप असणारे डॉ.अशोक थोरात जिल्हा शल्यचिकित्सक बीड यांना अभय दिले जात आहे, आम्ही जरी राजकारणात सक्रिय नसलो.आणि भविष्यात सक्रिय सहभाग घेणार सुद्धा नाहीत. परंतु खास तुमच्या सारख्या लोकांना पुन्हा निवडून देऊ नका ईतर कुठल्याही उमेदवाराला निवडून द्या पण बीड जिल्ह्यात चांगलें अधिकारी आले तर त्यांची बदली करण्यासाठी झटणा-या लोकप्रतिनिधींना घरीच बसवा ही मोहीम आम्ही नक्किच चालु करू या धमकी वजा विनंती व्दारे आवाहन करत आहोत.


पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब सुज्ञ पालकाची वर्तणुक अपेक्षित आहे , डॉ.अशोक थोरातांची हकालपट्टी कधी करणार?? :- डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर
--------------------------------------------++ मूंडे साहेब आपण बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. नाठाळ आणि अभ्यास न करणा-या खोडकर आणि ढ मुलांना अभ्यास नियमित केला नाही तर हाडांचे शिक्षक रागावतात,मग ते लेकरू घरी येऊन आईवडीलांना गुरूजी बदद्ल काहीही खोटं नाटं चढवुन सांगतात.आणि मग पालक गुरूजींची तक्रार घेऊन मुख्याध्यापक यांच्याकडे तक्रार करतात. तसा काहीसा हा प्रकार आहे म्हणून निर्णय घेताना विचार पुर्वक घ्या. घाई करू नये..
याच वेळी डॉ.अशोक थोरात जिल्हा शल्यचिकित्सक बीड यांच्यावर आपण गर्भपातातील आरोपी, शासकीय सेवेत असताना केज तालुक्यातील थांबवा जिल्हा परिषद गटातुन निवडणूक लढणे, तत्कालिन सत्ताधारी नेत्यांचा जाहीर प्रचार करणे आदि. आरोप पुराव्यासह मुख्य निवडणूक आयुक्त यांना दिले होते.आणि डॉ.अशोक थोरात यांची बदली करण्यात यावी अशी मागणी केली होती. आता आपणच पालकमंत्री बीड आहात. आता आपण डॉ.अशोक थोरात यांची पाठराखण का करीत आहात ??


लोकप्रतिनिधींच्या बालिश हट्टापोटी आकसाने बदली केल्यास रसत्यावर उतरून आंदोलन करू:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
----------------------------------------------


या विषयी कर्तव्यदक्ष अधिकारी मा.राहुलजी रेखावार जिल्हाधिकारी बीड, मा.हर्ष पोद्दार साहेब , पोलिस अधीक्षक बीड, मा. अजितजी कुंभार साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांची लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून बदली केल्यास तिव्र स्वरूपाचे आंदोलन रस्त्यावर उतरून करण्यात येईल,व  त्याची जबाबदारी सरकारची राहील असे निवेदन मुख्यमंत्री उदृधवजी ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजयजी मुंडे साहेब यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.