प्रतिनिधी : उलवे नोड येथिल विज ग्राहकांना जास्त रक्कमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत देयक आकारणीत पारदर्शकता आणावी व ग्राहकांच्या तकारींचे तातडीने निराकरण करावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारीणी सदस्य श्री . महेंद्रजी घरत यांनी उलवे नोड सेक्टर २३ येथिल कार्यालयात अभियंता श्री . राठोड साहेब यांची भेट घेवुन त्यांच्याशी चर्चा केली . राठोड साहेब यांनी ३ आठवडयात सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले . यावेळी श्री . महेंद्र घरत यांच्या सोबत उलवे नोड मधील श्रीरंग कमलासनन , संदीप सिंग , मेहुल अय्यर , आर . आर . सिंग , मोहम्मद , निर्मला भाटीया , नवनाथ भामणे , भावेश पणीकर , वसंत राजा , निकू तळवार , मनिषा सुरूवदे , कांचन अय्यर , सुजाता सुरूवदे , अलोक मंडल , सोनिया मकेर , नितू अहुजा , समिरा महाडीक , प्रिती यादव , सुचित्रा जाधव , आदी उपस्थित होते .