स्थानिक नगरसेवक, नागरिकांशी साधला संवाद
ठाणे (२५) : आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवसांपासून फिल्डमध्ये फिरून कोवीड १९ बाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी प्रतेक प्रभाग समितीचा दौरा करण्याचा निर्णय नुतन महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतला असून आज त्यांनी संपूर्ण लोकमान्यनगर सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्राची पाहणी केली.
या पाहणी दौ-यात त्यांनी ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह दिगंबर ठाकूर या स्थानिक नगरसेवकांशी चर्चा करून कोरोना विरूद्ध लढाईत ते करीत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.
आज सकाळी महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी लोकमान्यनगर-सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रात कोरोनाचे किती रूग्ण आहेत, कोणते कार्यक्रम राबविले जात आहेत याची माहिती घेतली. त्याचबरोबर लोकमान्यनगर सावरकरनगरमध्ये सुरू असलेल्या फिव्हर क्लिनिकला भेट देवून तेथील डॉक्टरांशी संवाद साधून नेमके कशाप्रकारे काम चालते याची माहिती घेतली.
यावेळी त्यांनी कंटेनमेंट झोनची पाहणी केली. तसेच नागरिकांशीही संवाद साधून मास्क वापरा, सोशल डिस्टंन्सींगचे पालन करा असे आवाहन केले. यावेळी त्यांच्या समवेत उप आयुक्त संदीप माळवी, सहाय्यक आयुक्त नयना ससाणे, डॉ. चारूशीला पंडीत आदी अधिकारी उपस्थित होते
चौकट
वॉर रूमला भेट
महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आज कोरोना कोवीड वॉर रूमला भेट देवून तिथे कशा प्रकारे काम चालते याची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत विशेष अधिकारी, कोवीड १९ रंजीत कुमार, अतिरिक्त आयुक्त(१) गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, कोरोना कोवीड कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. केंद्रे, डॉ. राणी शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.
फोटो १. महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी आज लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती
क्षेत्रा अंतर्गत प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी केली.
फोटो २. महापालिका आयुक्त विपीन शर्मा लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत
ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे यांच्याकडून या प्रभागामध्ये कोरोना सबंधित सुरु
असलेल्या कामाची माहिती घेतली.
फोटो 3. महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी नागरिकांशी संवाद साधला.
फोटो 4. महापालिका मुख्यालयातील तिस-या मजल्यावरील वॉर रुमला आज भेट देऊन
महापालिका आयुक्तांनी माहिती घेतली.