------------------------------------------------ (बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)बीड शहरांमध्ये स्व.काकु-नाना यांच्या नावाने वैद्यकीय क्षेत्रात गोरगरीबांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देऊन कमावलेले पुण्य,नगरपालिकेला शहरातील मुख्य भाग म्हणजेच भाजी मंडई मध्ये घाणिचा विळखा असताना तिकडे दुर्लक्ष करून शहराला कोरोनाचा हाटस्पाट करायचाय काय? हा बीडकरांचा पडलेला प्रश्न आहे...
भाजीमंडई घाणिच्या विळख्यात, साथीच्या आजारासमवेत कोरोनाला आमंत्रण
------------------------------------------------ बीड शहराच्या मध्यभागी आणि वर्दळीच्या ठिकाणी असणारै सदानकदा गजबजलेले ठिकाण म्हणजे भाजी मंडई, त्याठिकाणी भाजीपाला,फळे आदि. गोष्टी विकत घेण्यासाठी बीडकरांची झुंबड उडालेली असते.भाजीमंडई लगत नगर परिषदेचे नाव दर्शवणारी ईमारत आहे, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसते,कच-याचे ढीग,जनावरे गाई,म्हशी अस्ताव्यस्त वावरताना दिसताहेत. त्या इमारतीच्या कंम्पाउंड मध्ये लोकं मोटारसायकल लावत आहेत. त्याठिकाणी असणारी लोखंडी पत्र्याची शौचालय बंद कुलूप लावलेली आहेत.तिथल्या अस्वच्छतेचा गंभीर परिणाम शेजारील भाजी मंडई मध्ये येणा-या लोकांच्या आरोग्यावर होऊन भविष्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जीवनधारा वाटर ए.टी.एम.
नुसत्याच जाहीरातींचा भडीमार,४० वर्षे सत्ता हातात असुन करावा लागतो,कुणाचे अपयश आहे???
----------------------------------------------- ४० वर्षामध्ये नगरपालिका तसेच जास्त करून बीड विधानसभा सदस्य, खासदारकी, विविध खात्याची मंत्री पदे आपल्याच घरात असताना काम करून दाखवण्यापेक्षा जाहीरातीच्या माध्यमातून आस्तित्व टिकवण्याची केविलवाणी धडपड, निराशाजनक आहे.
जीवनधारा एटीएम:- बीड नगरपरिषद बीड आणि प्रथमेश एंटरप्रायजेस पंचवटी नाशिक,यांचा संयुक्त उपक्रम मा.जयदत्तजी आण्णा क्षीरसागर आणि भारतभुषण क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून असे लिहीलेले दिसुन येते. चारही बाजुंनी जाहीरात असणारे जीवनधारा वाटर एटीम बंद अवस्थेतील नगरपालिकेच्या निष्क्रीयतेची साक्षीदार आहेत.म्हणुनच बीडकरांच्या आयुष्याशी खेळू नका.
आरोग्य मंत्री मा.राजेश टोपे यांना लेखी तक्रार, कारवाईची मागणी:- डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर
----------------------------------------------- बीड शहरातील अस्वच्छता,नगरपालिकेचं दूर्लक्ष,कर्मचारी यांचा हलगर्जीपणा, राजकीय नेते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका यांची अनास्था यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात असुन कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर स्वारीचे आजार पसरण्याची दाट शक्यता असल्याने नागरीकांच्या आयुष्याशी घेळणा-या संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री,स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री यांना ई-मेल द्वारे पाठवले आहे.