| ![]() | ![]() ![]() | ||
|
*
(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) *काल परवा एक घटना घडली केरळ राज्यात एका छोट्याश्या वेल्लूर नदी शेजारील गावात एका हत्तीणीला भूक लागली असताताना एका नराधमाने तिला फटाक्याने भरलेला अननस खायला दिला तो फुटून हत्तीण मेली आणि विशेष म्हणजे ती गरोदर होती.तिचे शवविच्छेदन केल्यावर तिच्या पोटात एक बाळ आढळलं सगळीकडे सोशल मीडिया,टीव्ही,व्हाट्सअप,फेसबुक,न्यूज ब्रेकिंग आणि एक्सकॅलुसिव्ह चालू होत्या हे तब्बल एक महिना चालू राहील बऱ्याच बातम्याच्या टीव्ही चॅनेल वाल्यानी तर त्यावरच डिबेट पण बसविले मग काय सगळा देश एखाद्या जातिवंत प्राणीमित्रांप्रमाणे हत्तीणीला फटाके चारणाऱ्याचा मनातून निषेध करायला लागला इथपर्यंत सगळं ठीक आहे पण प्राण्यांना माणसाकडून काहीही इजा झाली तरी एव्हढा आगडोंब करणारा हाच समाज आमच्या दलित बांधवाना अमानुषपणे मारल्यावर गप्प राहतोच कसा ? आमच्या अरविंद बनसोड या स्पर्धा परीक्षा देऊन भविष्यात मोठा आयएएस ,आयपीएस अधिकारी होऊन देशाची गोर गरिबांची सेवा करणार होता त्या तरुणाला एक गॅस एजंसी मालक घरात कोंडून औषधं पाजून जीवे मारतो आणि आत्महत्या झाली असं जाहीर होत.किती मोठ दुर्दैव आहे आणि हे असं घडलं असताना आमचा सहिष्णू मनाला जाणारा समाज गप्प का ? आम्हाला याची चीड का येत नाही ? आम्ही याचा साधा निषेध पण का करत नाहीत ? आणि तथाकथित उच्चवर्णीयांच्या मुलीवर जीव लावला म्हणून खालच्या जातीचा माझा बांधव विराज जगताप ला बेदम मारून हत्या केल्यावर आपला प्राणीमात्रावर पण अतोनात प्रेम करणारा समाज गप्प बसतोच कसा ? या निर्घृण हत्या करणाऱ्याचा आपण निषेध का करत नाहीत ? आपण शासन दरबारी त्यांच्या झालेल्या हत्येचा जाब का विचारत नाहीत ? म्हणजे तो बौद्ध-दलित असल्या कारणाने तुम्ही त्याचे समर्थन नाकारता काय ? तो खालच्या जातीचा असल्या कारणाने त्याला समाज न्याय मिळवून देणार नाही काय ? तो खालच्या जातीत जन्माला म्हणून तुम्ही त्याच्या अन्याय अत्याचारा विरुद्ध आवाज उठवणार नाही काय ? याचाच अर्थ तुम्ही जातीयवाद तर करत नाहीत ना .......????*
*बापरे ! मी पुरोगामी महाराष्ट्रातच आहे ना ? जातीयवाद मुळासकट बाजूला सारून छत्रपती शिवबा राजेंना सर्व धर्म समभाव शिकवणाऱ्या माँ साहेब जिजाऊ आऊसाहेब मी तुमच्या मुलाने बहुजनांच्या हिताचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या माझ्या शिव छत्रपती शिवाजी महाराज राजेंच्या च राज्यात आहे ना ? मी शाहू,फुले,आंबेडकर यांचाच भूमीत आहे ना ? मी तमाम जातीयनिर्मूलनासाठी बलिदान दिलेल्या त्या महान वीरांच्याच मातीत आहे ना ? मग एव्हढा अत्याचार का काय गुन्हा आहे अमुचा ?आम्ही दलित आहोत हाच अमुचा गुन्हा ! कुठे आहे मानवता हित जपनारे एका अतिरेक्याला वाचवनारे ह्यूमन राईट चे लोक.अहो एका गावात हत्तीनिला मारले,एका गावात घोड्याला मारले,एका गावात वानराला मारले म्हूणन आपण सगळीकडे निषेध व्यक्त केलात नव्हे-नव्हे आपण त्यावर तात्काळ गुन्हे नोंद केले आणि लगेच तात्काळ त्यांना जेल मध्ये टाकले मग मी मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर आपणास एक प्रश्न विचारतो कि मुक्या प्राण्यांना मारल्यावर तळमळ करणारा,निषेध करणारा कायदेशीर कार्यवाही करणारा हा आपला समाज हजारो दलितांवरील अत्याचार अन्याय निमूटपणे का सहन करतो....? साधा निषेधही का करत नाही ...? आमचे जातबंधू व आदिवासी कापले जातात त्यांची अमानुष हत्या केली जाते ,त्यांची नग्नधिंड काढली जाते,त्यांना जिवंत जाळले जाते,त्यांना गाडीला बांधून जिवंत फरपटत ओढले जाते त्यांची डोळे,डोके फोडले जातात एव्हढं सगळं घडत असताना फक्त एकच जात निषेध करते कि जिच्यावर अन्याय झाला बाकी भ्रशब्दही काढत नाहीत हे दुर्दैव. मतदानापुरते दलितांची, आदिवासीची मते घेऊस्तोवर त्यांच्या ताटात जेवणारे मनुवादी नेते मूग गिळून गप्प का असतात ? जातीय विषमता दूर करायची असेल तर प्रत्येकाच्या मनातून व्हायला हवी.अजूनही गावागावात बेसुमार जातीयवाद आहे.समाज अजूनही जुन्या रूढी परंपरा पाळतो आहे.आणि जातीयहल्ले कायम आहेत याला जबाबदार फक्त सरकार नसून एक देशाचा नागरिक आणि समाजाचा एक घटक म्हणून आपण सर्वजण आहोत यात दुमत असण्याचं कारण नाही.*
*अहो आम्ही मानस आहोत आम्हाला माणसाप्रमाणे वागणूक द्या आम्हाला समानता हवी आहे,आम्ही धर्मवाद, जातीवाद,प्रांतवाद इत्यादींच्या कुबड्या सोडल्या पाहिजेत आपल्यातली दरी दूर करण्यातच आपल हित आहे आपण प्रगतराष्ट्र,महासत्ता,20 साव शतक,संगणक युग,डिजिटल इंडिया हे फक्त बोलतो ऐकतो पण प्रत्यक्षात मात्र आदिवासी व दलितांचे वाढते अत्याचार पाहून हे सगळं फेल आहे असे निदर्शनास येते आणि म्हणून सरकार ने यावर ठोस पाऊले उचलून योग्य कार्यवाही करावी हीच अपेक्षा.सरकार बदलत आहेत परिस्थिती मात्र कायम आहे नागपूर चा अरविंद बनसोड,पुण्याचा विराज जगताप,जळगाव चे दगडू सोनवणे कुटुंब,साळापुरी परभणी येथील अत्याचार,बीड मधील पारधी समाजाचे तिहेरी हत्याकांड,चंदनापुरी जालना येथील दलितांना अमानुष हाणमार,मंठा येथील शिक्षकाची जाचातुन आत्महत्या,परभणी,वैजापूर येथील घटना म्हणजे अखंड मानव जातीला काळिमा फासणाऱ्या या गोष्टी आहेत.शासनाने यावर विशेष कमिटी स्थापन करून हा जातीयतेचा अत्याचार थांबवावा नसता याचे समाजावर दूरगामी परिणाम होतील यात शंका नाही ...........आपलाच मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर, संपर्क - 9922541030*
Attachments area