(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)देशभरासह बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावाप्रमाणे अंबाजोगाई तालुक्यातील मौजे डिघोळअंबा गावातील शेतमजूर , कष्टकरी आणि गोर गरीब लोक दोन वेळच्या जेवणासाठी हैराण होते . महाराष्ट्र सरकारने जी रेशन वाटप करण्याची सुविधा केली त्यात स्थानिक रेशन दुकानदार प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ करत होते . यामुळे प्रत्येक कुटुंबाला रेशन दुकानदार जेवढे रेशन देईल तेवढेच घेऊन गप्प बसावे लागत असे . गावातील कोणीही रेशन दुकानदाराला जाब विचारण्याची आपल्या हक्कात दिलेले प्रत्येकी 5 किलो तांदूळ व नियमित रेशन मागण्याची हिंम्मत होत नव्हती कारण दुकानदाराची गावात प्रचंड दहशत होती आणि त्यातल्या त्यात सत्तेत असलेल्या मोठ्या नेत्याचा हात पाठीशी असल्याने दुकानदार कोणालाच गुमानत नव्हता . ज्या कुटुंबात 6 व्यक्ती आहेत त्यांना 12 kg + 30 kg = 42 kg तांदूळ आणि 18 kg गहू देण्याऐवजी दुकानदार अनुसूचित जातीच्या गोर गरीब लोकांना त्या लाभधारकाला 10 kg गहू आणि 5 kg तांदूळ देऊन दुकानाहून हाकलून लावायचा ....
ही बाब अक्षय भुंबेच्या लक्षात त्यावेळी आली ज्यावेळी तो गावी जाऊन त्याची पाहणी केली आणि प्रत्येकाला विचारपूस केली . अक्षयने तमाम डिघोळअंबा गावातील लोकांना आवाहन केले की 2 दिवस कोणीही रेशन आणायला दुकानात जाऊ नका मी तहसीलदार साहेबांना संबंधित तक्रार करतो नंतर बघू काय होईल ते . अशा संकट काळातही गोर गरिबांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला जातोय याची तक्रार करताच गावात तलाठी आणि मंडळ अधिकारी दुकाना समोर आले आणि मोठ्या संघर्षानंतर दुकानदार वठणीवर येऊन गावातील प्रत्येकाला त्यांच्या हक्काचे रेशन मिळू लागले ...
ही प्रक्रिया वाटते तितकी सोप्पी नव्हती यात खूप संघर्ष सोसावा लागला संघटित शक्ती कामाला आली आज गोर गरिबांच्या दोन टायमाच्या जेवणावर पण अशाच लोकांचा अधिकार आहे हे आज महाराष्ट्रासाठी लज्जास्पद बाब आहे . या सनदशीर कायदेशीर उचललेल्या पावलामुळे गावातील प्रत्येक जण मग तो कोणत्याही समाजाचा असो अक्षय बद्दल त्यांच्या मनात आदर भावना निर्माण झाली कारण समोर येऊन व्यवस्था बदल करायला नेतृत्व म्हणून कोणीच पुढे येत नसते एकतर त्यात लढण्याची क्षमता आणि हिंम्मतच लागते ती अक्षयने केली ....
अक्षयला याच गोर गरिबांची पोट कशी भरत आहेत ते कौटुंबिक जीवनात सामाजिक जीवनात किती परेशान आहेत हे जाणवले मग याला पर्याय काय ? हा प्रश्न निर्माण झाला आणि अक्षय पुढे होऊन न थांबता यांचा स्वाभिमान , जागृत व्हावा लोक आर्थिक सशक्त व्हावी त्यांच्या पोटा पाण्याचा या महामारी च्या काळात तरी प्रश्न सुटावा म्हणून तहसील प्रशासनाकडे गेला ...
...........…