करपेचा महाप्रताप,साष्टांगला चार वर्षात बिंदुसरा प्रकल्पात दुरूस्तीच्या नावाखाली दिले 15 लाख रूपये
साष्टांगच्या अध्यक्ष,सचिवावर मोक्कातंर्गत गुन्हा दाखल करा-डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
----------------------------------------------
(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर): - पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून अ
धिक्षक अभियंता रघुनाथ करपेने साष्टांग मजूर संस्थेला हाताशी धरून मोठा महाप्रताप केला आहे. गेल्या चार वर्षात केवळ बिंदुसरेच्या गेट,गाळ काढणे, कॅनाल यावर पंधरा लाखापेक्षा जास्त रक्कम दुरूस्तीच्या नावाखाली दिली गेली आहे. या सर्व बोगस प्रकरणात रघुनाथ करपे जेवढा जबाबदार आहे तेवढाच साष्टांग मजूर संस्थेचे अध्यक्ष, सचिव,संचालक मंडळ,सभासद आहेत. त्यामुळे शासनाचा निधी सामूहिक रित्या बोगस कामे दाख
वून उचलला गेला आहे.त्यामुळे डॉ.गणेश ढवळे यांनी अधिक्षक अभियंता करपेसह साष्टांगच्या अध्यक्ष,सचिवासह संचालक मंडळ,सभासदावर मोेक्कातंर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,जलसंधारण मंत्री,पालकमंत्री,विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ठरविक मजुर संस्था आणि अधिक्षक अभियंता करपेंचा जांगडगुत्ता
----------------------------------------------
दोन ते चार मजूर संस्था हाताशी धरून कोट्यावधी रूपयांची बोगस कामे करून शासनाची फसवणूक करून संयुक्तरित्या हा निधी उचलला गेला आहे. त्यामुळे अधिक्षक अभियंता करपेच्या पापाचा घडा साष्टांग,पाणी व इतर संस्थेच्या माध्यमातून फुटणार आहे आणि विशेष करून साष्टांग संस्थेचा बोगस कारभार करपेच्या मानगुटीवर बसला आहे. त्यामुळे कितीही इलाज केला तरीही करपेचा महाप्रताप बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. मात्र याच करपेच्या आशीर्वादाने साष्टांग मजूर संस्थेने केवळ चार वर्षात बिंदुसरा प्रकल्पाच्या दुरूस्तीवर पंधरा लाखापेक्षा जास्त खर्च केला आहे. विशेष म्हणजे गेट,कॅनाल,गाळ काढणे इतर कामे दाखून हा गंभीर प्रकार केला आहे. मात्र अधिक्षक अभियंता रघुनाथ करपेच्या भ्रष्टाचाराचा घडा भरण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये एका संस्थेचा भ्रष्टाचार पुढे आल्यानंतर दुसर्या संस्थेने तिसर्या संस्थेचे पुरावे दिले आहेत. त्यामुळे या संस्थेच्या बोगस कारभाराचे भूत रघुनाथ करपेच्या मानगुटीवर बसले आहे.त्यामुळे साष्टांग संस्थेने केलेल्या चार वर्षातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, साष्टांगच्या अध्यक्ष, सचिवासह संचालक मंडळ, सभासदसह कामाची पाहणी करणार्या अधिकारी,कर्मचार्यांवर संयुक्तरित्या गुन्हेगारी अंतर्गत मोक्कातंर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी निवेदन देऊन ईमेलव्दारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,जलसंधारण मंत्री, पालकमंत्री,विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.