*लाॅकडाऊनमधे अनधिकृत मोबाईल टॉवर उभा करणे पडले महागात.*
*24 तासांची नोटीस देऊन तात्काळ निष्कासन कारवाई.*
*विना परवानगी बांधकामाला करणा-या टाॅवर कंपनीला दणका !*
पनवेल दि.21.07.2020
पनवे
ल महानगरपालिका हद्दीमधील खारघर प्रभागातील इनामपुरी गावामध्ये एका खासगी जमिनीवर हाय टेन्शन विद्युत वाहिनीच्या बाजूलाच मोबाईल टॉवर उभारण्यात येत होता. *याबाबत माहिती मिळताच आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने कारवाई प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांनी निष्कासन कारवाई केली.*
संबंधिताविरूद्ध दि. 20 जुलै 2020 रोजी 24 तासात स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घेण्याची नोटीस दिली होती. या नोटीसला संबंधित मोबाईल टाॅवर कंपनीने कोणतेही उत्तर दिले नाही तसेच अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते.
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग हादरले आहे. सर्वत्र कोरोनाशी लढण्यास प्रशासन व जनता व्यस्त आहे. महानगरपालिका हद्दीत लाॅकडाऊन सुरू आहे. याच कामात प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या असताना काही व्यक्ती बेकायदेशीर कामे करत आहेत. अशा व्यक्तींना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
आज प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांच्या पथकाने खारघर येथील इनामपुरी गावातील म्हात्रे यांच्या एका खासगी जागेवर विना परवानगी उभारलेला मोबाईल टाॅवर निष्कासित केला. त्याबाबत पालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. परवानगी न घेता टॉवरचे बांधकाम सुरू होते. म्हणून विना परवाना टॉवरचे बांधकाम आज उध्वस्त करण्यात आले.
पालिका प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन कोणी अनधिकृत बांधकाम करत असेल त्याच्यावर कारवाई होईल हे प्रशासनाने आज दाखवून दिले आहे.
*सदर अनधिकृत बांधकामाबाबत संबंधितांना 24 तासांची मुदत दिली होती, त्यांनी महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. नोटिशीची मुदत संपताच पालिकेमार्फत या अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आलेली आहे. अशी माहिती उपायुक्त अतिक्रमण श्री.जमीर लेंगरेकर यांनी दिली.*
ReplyForward |