कारची ट्रक ला धडक
(पनवेल प्रतिनिधी-- शशिकांत चव्हाण) मुंबई बेंगलोर एक्सप्रेस वे वर कळंबोली येथे एका भरधाव कार ने पाठीमागुन एका ट्रक ला जोराची धडक दिली. या मध्ये 50 वर्षीय व्यक्ती जखमी झाला आहे. कार चालका विरोधात खांडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
डिझायर कार( क्र. एम एच ०२ ई एच ५३५०) चालक अरुण चव्हाण हे रुस्तम देवराम आगलावे यांना मुंबई च्या दिशेने घेऊन येत होते . चालक अरुण चव्हाण यास कार चालवताना झोप येत असल्याने रुस्तम यांनी चालक अरुण यास कारचा वेग कमी करण्यासाठी व कार थांबविण्यासाठी सांगितले परंतु चालक अरुण चव्हाण यांनी काही ऐकले नाही.
24 जुलै रोजी रात्री एक च्या सुमारास ते मुंबई च्या दिशेने येत असताना कलंबोली येथे आल्यानंतर चालक अरुण चव्हाण यांच्या ताब्यातील कारने समोरील एका ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात रुस्तम देवराम आगलावे यांच्या डोक्याला तोंडाला व पाठीला जखमा झाल्या आहेत. तर चालक अरुण चव्हाण यांच्या डोक्याला फ्रॅक्चर झाले आहे.
खांदेश्वर पोलिसांनी चालक अरुण चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे