पथविक्रेत्यांना रूपये १०,०००/- पर्यंतचे खेळते भांडवली कर्ज उपलब्ध होणार आहे."*   *-जमीर लेंगरेकर, उपायुक्त (मुख्यालय) पनवेल महानगरपालिका.*


*"पथविक्रेत्यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी शासनाच्या पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्यावा ! केंद्र शासन पुरस्कृत "पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi)" पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म-पतपुरवठा सुविधा योजना आहे. यानुसार पथविक्रेत्यांना रूपये १०,०००/- पर्यंतचे खेळते भांडवली कर्ज उपलब्ध होणार आहे."*

  *-जमीर लेंगरेकर, उपायुक्त (मुख्यालय) पनवेल महानगरपालिका.*

 

          पथविक्रेते अनौपचारिक नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक आहेत. ते नागरिकांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे स्वस्त दरात वस्तू व सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यांच्याद्वारे पुरवल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये उदा. भाज्या, फळे, तयार खाद्यपदार्थ, चहा, भजी, पाव, अंडी, कापड, वस्त्र, चप्पल, कारागीराद्वारे उत्पादित वस्तू, पुस्तके / स्टेशनरी इत्यादींचा समावेश होतो. तर सेवेमध्ये उदा. केशकर्तन दुकाने, चर्मकार, पान दुकाने, कपडे धुण्याची दुकाने इत्यादींचा समावेश होतो. 

        कोविड -१९ (साथीचा रोग) सर्वत्र पसरलेला असल्यामुळे आणि परिणामी टाळेबंदी मध्ये (Lockdown) पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरित परिणाम केला आहे. बहुदा ते कमी भांडवलावर पथविक्री करतात आणि जे काही भांडवल त्यांच्याकडे होते तेही या टाळेबंदीमध्ये (Lockdown) शिल्लक राहण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळते भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्याची आवश्यकता आहे. याची जाणिव शासनाला आहे.

       पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी योजना राबविण्याबाबत केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांनुसार त्यानुषंगाने राज्यात महानगरपालिका व नगरपालिकेत *केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी - पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना* राबविण्यात येत आहे.

सदर योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त, पनवेल महानगरपालिका यांनी जाहीर आवाहन केले आहे. त्यासाठी खालील संकेतस्थळावर इच्छुकांनी निधी प्राप्त करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

*पथविक्रेता कर्ज करण्यासाठी अर्ज पद्धत:-*