यमुना सामाजिक संस्थेच्या रुग्णवाहिका करत आहेत
कोरोना बाधित रुग्णां ची अविरत सेवा.
प्रतिनिधी : श्री. महेंद्र घरत यांनी सामाजिक बांधीलकीतून आपल्या प्रत्येक वाढदिवसाला यमुना सामाजिक - शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून एक रुग्णवाहिका गरीब लोकांच्या सेवेसाठी उरण, पनवेल, खालापूर तालुक्यात लोकार्पण केलेल्या आहेत. आज ह्याच रुग्णवाहिका गरीब - गरजू कोरोना बाधीत रुग्णांना २४ तास अविरत सेवा देत आहेत . त्यामुळे गरीब रुग्णांना मोठा आधार मिळत आहे. आपण रुग्णवाहीकेच्या माध्यमातून गरीब गरजूंची सेवा करण्याचा तसेच अजून पुढे गरजूंसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा मनोदय श्री. महेंद्र घरत यांनी व्यक्त केला. सर्व रुग्णवाहीकेच्या चालकांना यमुना सामाजिक - शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री. महेंद्र घरत यांनी गाडी निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझर , फेसशिल्डचे वाटप केले व चालकांनी कोरोनाच्या काळात केलेल्या कामाचे कौतुक केले. या महाभयंकर रोगाला घाबरून अनेक ठिकाणच्या रुग्णवाहिका ह्या घरीच थांबून होत्या अश्या अडचणीच्या काळात लोकांना रुग्णवाहिका मिळत नाहीत, बऱ्याच ठिकाणी रुग्णवाहिका असूनही त्या सेवा देत नाहीत अश्या परिस्थितीत या परिसरातील सर्वसामान्य जनतेला मोफत हॉस्पिटल मध्ये नेण्याचे काम केले आहे. त्याच बरोबर एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह पेशंट ला एका हॉस्पिटल मधून दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करण्याचे काम सुद्धा या काळात या संस्थेच्या 4 रुग्णवाहिका करत आहेत हि खुप कौतुकास्पद बाब आहे. यमुना सामाजिक, शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री महेंद्रशेठ घरत यांनी या चारहि रुग्णवाहिकेच्या चालकांना सक्त सुचना दिल्या आहेत कि कोणत्याही परिस्थितीत हि सेवा खंडित होऊ देऊ नका 24 तास हि सेवा आपण चालु ठेवावी व समाजातील गरजवंतांना त्याचा उपयोग व्हावा. त्याप्रमाणे हि सेवा आजही अविरतपणे सुरु आहे.
2 Attachments