पनवेल पालिकेतर्फे अँटीजन टेस्ट सुरू, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश
पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुले कोरोना चाचण्यांची संख्या वाढवणे गरजेचे असल्याने त्यासाठी अँटीजन टेस्ट किट खरेदी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी पालिकेकडे गेली केली होती. त्याला यश आले असून पालिकेने अँटीजन टेस्ट सुरू केली आहे.
पनवेल महापालिका हद्दीत कोरोना चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ते प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे वारंवार प्रयत्न करत आहेत अशा सूचना ते पालिकेला करताना दिसून येत आहेत. कोरोनाची लागण झाली किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी पनवेल महानगर पालिकेने खारघर मधील नागरी आरोग्य केंद्रात चाचणी सुरू केली आहे या चाचणीनंतर अवघ्या सहा मिनिटात रुग्णास अहवाल प्राप्त होत आहेत. महापालिका हद्दीत सहा प्राथमिक आरोग्य केंद्र अशाप्रकारे टेस्ट करण्यात येणार आहेत. सध्या खारघर या ठिकाणी अँटीजन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. खारघर परिसरात कोरोना चे रुग्ण वाढत आहेत. पालिकेने 21 हजार चाचण्यांचे उद्दिष्ट समोर ठेवून सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात या covid-19 अँटीजन टेस्ट सुरू केले आहेत. मोफत स्वरूपाच्या या टेस्ट असणार आहेत. अवघ्या एका तासात कोरोना चा अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली आहे. 20 जुलैपासून पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटीजन टेस्ट चा उपयोग केला जात आहे. याद्वारे तपासणी केल्यास वेळेत अहवाल प्राप्त होत आहे. पूर्वी कोरोनाची लक्षणे दिसल्यावर कोविंड चाचणीचा अहवाल प्राप्त होण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागत असे. मात्र अँटीजन टेस्टमुळे तासाभरात अहवाल प्राप्त होत असल्याने नागरिकांच्या दृष्टीने ही चांगली बाब असल्याचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले आहे.