भारत हा कृषीप्रधान देश आहे ? इथे दारू अन गुटख्याचा तुटवडा कधीच होत नाही मात्र बी-बियाणे आणी खताचा नक्कीच होतो- डॉ.जितीनदादा वंजारे.* ( बीड-प्रतिनिधी---विवेक कुचेकर)भारतात विविध भागात विविध प्रकारचे पिके घेतली जातात.शेतीच्या उत्पादनात भारत हा अग्रगण्य देश आहे.भारत देश एक कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो पण इथे प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच आहे.इथे ऐन पेरणी च्या काळात बी बियाणे चा तुटवडा भासतो तर कधी योग्य वेळेत लागणारी खते मिळत नाहीत असा सवाल सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी नेते आणी प्रगतशील शेतकरी मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला. आता औंदाच्या पीक हंगामात भरपूर पाऊस झाला सततच्या दुष्काळाने शेतकरी त्रस्त असताना यंदा जास्त पावसामुळे पिके वाया गेली.अति पावसामुळे नीचरा न होणाऱ्या जमिनीतील पिके वाया गेली,अश्या परिस्थितीत योग्य खताचे नियोजन केल्यास पिके वाचवता आली असती.म्हणजे युरिया हे खत मिळाले असतें तर पीक वाया गेली नसती पण योग्य वेळी तुटवडा भासला आणी शेतकऱ्यांची पिके वाया गेली.ही वस्तुस्थिती आहे.सोयाबीन ची बोगस बियाणे बाजारात आहेत.इतरही बी बियाणे नकली बाजारात आली आहेत एव्हढंच नव्हे तर नकली आणी बनावट खते पण बाजारात आहेत ही आपल्या कृषीप्रधान देशाची शोकांतिका आहे यावर सत्ताधाऱ्यांनी योग्य पाऊले उचलून कठोर कार्यवाही करावी असे मत डॉक्टर जितीनदादा वंजारे यांनी व्यक्त केले. कृषीप्रधान देशात नेमकं घडतयं काय .सत्ता कोणाचीही असो परिस्थिती कायम आहे.कृषी कंपन्या आणी मंत्र्याच्या साहाय्याने हे होतय का हे पण पाहणे गरजेचे आहे.मंत्र्याच्या कंपन्या आहेत त्यांचच काळपाप असन्याची शक्यता नाकारता येत नाही.देशात सर्वत्र हीच बोंब आहे.शेतकरी इतर समस्यांनी त्रस्त असतो मात्र यातच बी- बियाणे व खते योग्य आणी वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्यांच अतोनात नुकसान होत.हे थांबवन्यासाठी शासनाने योग्य पाऊले उचलली पाहिजेत.शेतकऱ्यांच्या बांधावर बीबियाणे आणी खते पोहोच केली पाहिजेत ही जबाबदारी कृषीमंत्र्याची आहे त्यांनी ती चोखपणे पार पडायला हवी.नुसतं भारत देश कृषीप्रधान म्हणून चालणार नाही त्याला कष्टही घ्यावे लागतील.शेतकऱ्यांच्या खताचा,बी-बियानांचा व शेतीमालाचा भाव ठरवणारे एसी मध्ये बसणारे वळू जेंव्हा शेतात येऊन काम करतील तेंव्हाच त्यांना शेतकऱ्यांची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.नुसतं गप्पा मारून चालणार नाही प्रत्यक्ष कृती पाहिजे .याचवर्षीच उदाहरणं घ्या सगळ्या आमदार खासदार मंत्री यांनी सांगितलं होत लॉकडाउन पिरियड मध्ये सर्वाना बांधावर खते बी-बियाणं मिळतील पण हे फक्त गाजर निघाल प्रत्यक्षात ही 'मुंगेरीलाल के सपने' या पेक्षाही भ्रमनिराश करणारी गोष्ट ठरली यापेक्षा मोठ दुर्दैव कोणत ? देशाचे मंत्री,मुख्यमंत्री खोटं बोलत असतील तर साधी साधी स्टॉकिस्ट् ,दुकानदार काय करत असतील याची कल्पना न केलेलीच बरी.आणी हे प्रत्येक वर्षी होताना दिसतंय.आणी या पापाच भांडाफोड होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना तात्पुरती कर्जमाफी किंवा इतर आमिष दाखवायची हे बंद झालं पाहिजे.शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर होऊच नये अशी परीस्थिती निर्माण व्हायला हवी.नंतर कर्जमाफी देण्यापेक्षा कारण शोधून अगोदर काय केले पाहिजे असा आयोग निर्माण करून यावर चर्चा व्हायला हवी. शेतकऱ्यांना सामावून घेवून यावर व्यापक विचार करून योग्य निर्णय घ्यायला हवेत असे मत शेतकरी नेते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना असंख्य समस्याना तोंड द्यावे लागते.निसर्गाच्या कोपाने तर शेतकऱ्यांच कंबरड मोडलं आहे.यातच सत्ताधाऱ्यांचा ढिसाळ नियोजनाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.शेतकऱ्यांना विज रात्री बारा नंतर,शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही,कापूस सडून गेला तरी अजूनही घेईनात,बोगस बियाणे ,बोगस खते आणी निसर्गाचा कोप या सर्व कारणाने शेतकरी आत्महत्या करत आहेत म्हणून शासनाने योग्य पाऊल उचलली पाहिजेत असे मत डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.....
|