महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागातर्फे सॅनिटाईजर्सचे वाटप*
कोरोनाच्या संकटामुळे अजित पवार यांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी,चाहत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.बॅनरबाजीला,सार्वजनिक कार्यक्रमाला बगल देत कोविडच्या धर्तीवर सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्याचे ठरवले आहे.या अनुषंगाने पनवेल शहर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर यांनी पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून पनवेलमधील पत्रकार,तळोजा कारागृह,अग्निशमन जवान,पोलीसांना सॅनिटायझर्सचे वाटप केले. सदर प्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर सर ,उपाध्यक्ष हर्षद लोखंडे, जिल्हासचिव गणेश पाटील, गोविंद मोरे , प्रभाग अध्यक्ष राहुल अडांगळे, धनाजी सोनावणे, सचिन पांचाळ,संदिप खुरे, आदी प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी किशोर देवधेकर म्हणाले,पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.समाजमनाचा आरसा आहे.आज पनवेल परिसरात कोरोनाचे संकट घोंगावत असताना येथील सर्व अत्यावश्यक सेवेत आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे.त्यामुळे त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे.हे ओळखून पार्थ पवार फाउंडेशच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी पत्रकारांना फेस शिल्ड मास्क व सॅनिटायझर्सचे मोफत वाटप करण्यात आले होते.दरम्यान राष्ट्रवादीचे नेते ना.अजित पवार यांचा २२ जुलै रोजी असलेला वाढदिवस आम्ही कार्यकर्ते दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतो.परंतु यंदाच्या वाढदिवसावर कोरोनाचे सावट असल्याने दादांचा वाढदिवस साजरा करता येत नसल्याची खंत वाटत आहे.तरीही कोरोनाच्या धर्तीवर पत्रकार,पोलीस,अग्निशमन दलाचे जवान आदींना सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात येत आहे.