पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आय.ए.एस. दर्जाचा आयुक्त देण्याची सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढू लागल्याने कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी महापालिकेला आय.ए.एस. दर्जाचा आयुक्त देण्याची सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. कोविड टेस्ट केल्याशिवाय कोणत्याही इतर आजारावर खाजगी रुग्णालयात उपचार केले जात नाहीत, फक्त लाखो रुपयाची बिले वसूल करून लूटमार चालू असल्याचा आरोप गवळी यांनी केला आहे .
पनवेल महानगरपालिका हद्दीत अनेकवेळा लॉकडाउन करूनही पनवेल व नवीमुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नाही. कोरोना रुग्णावर महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार करण्यात येतील व खाजगी रुग्णालयातील ८०% बेड्स अधिग्रहित करण्यात येतील असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर व स्पष्ट केले आहे. मात्र पनवेल महापालिका हद्दीत आयुक्तानी कोणत्याही प्रकारे शासकीय नियमाचे काटेकोर अंबलबजावणी केलेली नाही. पनवेल महापालिका आयुक्तांनी ज्या मोजक्याच रुग्णालयांना कोरोनाचे उपचार करण्याची मान्यता दिली आहे त्या रुग्णालयामध्ये एम. जी. एम. रुग्णालय, कळंबोली, शासकीय उपजिल्हा रुग्णालयमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार होत आहेत. ज्या वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, सदर वसाहती / सोसायटी 'प्रतिबंधित क्षेत्र' घोषित करणे गरजेचे होते आणि या वसाहती / सोसायटीत मागील १५ दिवसापासून पनवेल महानगरपालिकेने निर्जंतुकीकरण औषध फवारणी केलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. खांदा कॉलनी येथील तीर्थराज सोसायटीमध्ये इमारत क्र. ६, ७, ८,१०, १२, १५ आणि १७ मध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तरीही पनवेल महापालिका आयुक्तांच्या ढिसाळ कारभारामुळे स्वछता व निर्जंतुकीकरण औषध फवारणी मोहीम राबवण्यात आलेली नसल्याचा आरोप गवळी यांनी पाठविलेल्या निवेदनात केला आहे. या सोसायटीमध्ये मध्यमवर्गीय, गरीब नागरिक राहत असेलेली ३२० घरे व २० इमारती असणारे मोठी सोसायटी आहे. सदर सोसाटीमधील प्रत्येक व्यक्तीला खाजगी रुग्णालयातील भरमसाठ खर्च लॉकडाउनमध्ये परवडणारा नाही. त्यामुळे वसाहतीतील, पनवेल महानगरपालिका हद्दीतील व नवीमुंबईतील गरीब गरजू रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळणे बाबत सर्व संबंधितांना आदेश देण्यात यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
सततचे लॉकडाउन, बेकारी, आर्थिक समस्या, कोरोनाचे भय व तणावग्रस्त वातावरण, रायगड जिल्ह्यात ६५ नागरिकांनी आत्महत्या केली आहे, त्यामुळे याबाबत सविस्तर आढावा घेऊन उपाय योजना कारण्याबाबत योग्य ती प्रतिबंधांमात्मक व धोरणामात्मक कार्यवाही करावी, पनवेल आणि नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील सर्व खाजगी हॉस्पिटलमध्ये 'महात्मा फुले जण आरोग्य योजना लागू करणे, ज्याप्रमाणे मुंबईत वरळी,धारावी, मालेगाव मधील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी 'चेस द व्हायरस' / 'बिट द व्हायरस' योजना सुनियोजित पद्धतीने राबवण्यात आली आहे, त्याच धर्तीवर पनवेल आणि नवी मुंबईत कोरोना नष्ट करण्यासाठी आणि जनतेचे प्राण वाचवण्यासाठी सदर संकल्पना सुनियोजित पद्धतीने कालबद्ध पद्धतीने राबवण्यात यावी,खाजगी रुग्णालयातील ८०% बेड्स कोरोना बाधित रुग्णांसाठी विना विलंब अधिग्रहित करून गरीब मध्यम वर्गीय रुग्णावर मोफत उपचार करणे, पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढत प्रभाव रोखण्यासाठी आइ.ए.एस. दर्जाचा सनदी अधिकाऱ्याची आयुक्त नियुक्त करून, इंडिया बुल्स ह्या इमारतीचे कोरंटाईन सेन्टर रद्द करून योग्य ती कारवाई व उपाययोजना करण्याच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
Attachments area