श्रावणी सोमवार कपिलधार,नागनाथ,बेलगांव मंदिर कुलुपबंद, माहेरवाशिणींची खंत,बच्चेकंपनीचा हिरमोड :- डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर
------------------------------------------------ (बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)बीड जिल्ह्यातील मंदिरे कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर कुलुपबंद असल्यामुळे पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने दर्शनासाठी आलेल्या पंचमी निमित्ताने माहेरी आलेल्या माहेरवाशिंनींना गाभा-याऐवजी कुलुपबंद मंदिराच्या बाहेरून दर्शन घ्यावे लागत असल्याची खंत आहे तर खेळणी,पाळणे नसल्यामुळे बच्चेकंपनींचा हिरमोड झालेला दिसुन येतो.
माहेरवाशिणींची खंत:- कूलुपबंद दर्शन
----------------------------------------------- पंचमीसाठी माहेरी आलेल्या माहेरवाशिणींना दरवर्षीप्रमाणे श्रावणी सोमवार निमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शन घेण्याची संधी यावर्षी कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या मंदिरबंद आदेशाचे स्वागत केले असले तरी गाभा-यातून दर्शन घेता आले नाही याची खंत मनाशी आहे.
बच्चेकंपनीं
चा हिरमोड-:- श्रावण सोमवार निमित्ताने मंदिरात भरणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर बंद असल्याने रहाटपाळणे, खेळण्याची दुकाने, गरमागरम भज्जी,जिलेबी यांची पालामधिल दुकाने बंद असल्याकारणाने हिरमोड झालेला दिसुन आला.
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर:-
-मंदिरे कुलुपबंद असली तरी पोलिस प्रशासनाचे आभार
----------------------------------------------
जिल्हा प्रशासनाचे आदेश मंदिर कुलुपबंद असले तरी पोलिस
प्रशासनाची सतर्कता आणि संयमीभुमिका आणि भाविकांची समजुत घालण्याची त्यांना नम्र विनंती करत गर्दी टाळावी यासाठी केलेले आवाहन यामुळे पोलिस प्रशासशनाचे भाविकांनी आभार मानले आहेत.
ReplyForward |