पनवेल तालुका इंटक अध्यक्षपदी श्री . दिपक ठाकूर यांची नियुक्ती इंटकचे राष्ट्रीय सचिव श्री . महेंद्र घरत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान प्रतिनिधी पनवेल : गेली अनेक वर्ष कामगार क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करत असलेल्या तरूणांना त्यांच्या कार्याची दखल घेवुन व त्यांच्या कामास पदाची जोड मिळून त्यांना पूढे कामगार क्षेत्रात काम करण्यास प्रोस्ताहन देण्याच्या हेतूने इंटकचे राष्ट्रीय सचिव श्री . महेंद्र घरत यांनी उरण व पनवेल मधील तरूणांना इंटकच्या राष्ट्रीय प्रवाहात आणून इंटक संघटना वाढविण्याच्या दृष्टीने नेहमीच पूढचे पाऊल टाकले आहे . आज त्यांच्या सोबत २०० ते ३०० तरूणांची फौज कामगार क्षेत्रात काम करत आहे व त्यामुळेच कामगार संघटना रायगड जिल्ह्यात वाढत आहे . श्री . महेंद्र घरत यांच्या पनवेल येथील कार्यालयात छोटेखानी झालेल्या कार्याक्रमात श्री . दिपक नामदेव ठाकूर रा . भाताण यांची पनवेल तालुका इंटक अध्यक्षपदी तर श्री . राजेंद्र जगन्नाथ भगत रा . चिरनेर यांची उरण विधानसभा युवक इंटक अध्यक्षपदी तसेच कु . आदित्य यशवंत घरत रा . जासई यांची उरण तालुका युवा इंटक सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली . या प्रसंगी इंटकचे राष्ट्रीय सचिव मा . श्री . महेंद्रजी घरत , महाराष्ट्र इंटकचे सचिव श्री . पि.के. रामण , महाराष्ट्र इंटकचे सहसचिव श्री . वैभव पाटील , उरण तालुका इंटक अध्यक्ष श्री . संजय ठाकूर , पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री . वसंत काठावले , इंटकचे मुरलीधर ठाकूर , जयवंत पाटील , विवेक म्हात्रे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .