( पनवेल प्रतिनिधी--शंशिकांत चव्हाण): कोविड-१९ चे नव्याने रुग्ण आढळलेल्या इमारती कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचा निर्णय पनवेल महानगरपालिकेने घेतला आहे. कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी कंटेनमेंट म्हणून घोषित केलेली संपूर्ण इमारत सील केली जाते. नव्याने कोरोना रुग्ण आढळलेल्या पालिका क्षेत्रातील २० इमारती कंटेनमेंट झोन (कोरोनाबाधित क्षेत्र) घोषित करण्यात आलेल्या आहेत.
या कंटेनमेंट क्षेत्रात तळोजा येथी
ल घर क्रमांक १३४, तळोजा येथील घर क्रमांक ५०५, कळंबोली सेक्टर ३४ अंचित टॉवर, खारघर सेक्टर ५ अधिराज गार्डन बी विंग, खांदा कॉलनी सेक्टर १० बिल्डिंग नं. १६ पी एल ५, कामोठे सेक्टर ३६ कैलास हाइट्स, कामोठे सेक्टर ६ थारवाणी रेसिडेन्सी, तक्का पामरुची बिल्डिंग बी विंग, रोडपाली सेक्टर १७ अलकनंदा अपार्टमेंट, रोडपाली नवी मुंबई पोलीस मुख्यालय क्वार्टर्स, कळंबोली सेक्टर ११ नील संकुल बिल्डिंग नं.
१, खारघर सेक्टर १३ हावरे टीयारा सी विंग, तळोजा फेज १ सेक्टर ११ पायल हाइट्स सोसायटी, कामोठे सेक्टर १८ यश गार्डन सोसायटी, कामोठे सेक्टर १४ यशदीप अपार्टमेट ए विंग, नवीन पनवेल सेक्टर १३ सिडको वसाहत ए टाइप चाळ, जुने पनवेल ओएनजीसी कॉलनी क्वार्टर्स नंबर २४९, रोडपाली सेक्टर १७ एक्सलन्स टॉवर, खारघर सेक्टर ११ अनसुया सोसायटी बी विंग, कळंबोली अग्निशमन अधिकारी क्वार्टर्स आदींना नव्याने कोरोनाबाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणच्या रहिवाशांनी विशेष काळजी घेत बिल्डिंगच्या लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करण्याचे अवाहन पालिकेच्या मार्फत करण्यात आले आहे. तसेच सोसायटी परिसरात फेरफटका मारताना कुठेही स्पर्श होणार नाहीत याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना पालिकेच्या मार्फत करण्यात आलेल्या आहेत.
ReplyForward |