भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या बंधुने ग्रामविकास मंत्रालयाच्या १३ कोटी रुपयांची केली माती, पावसाळ्यापूर्वीच रस्ता उखडला, पंकजाताई मुंडेच्या पराभवास हेच भ्रष्ट ठेकेदार कारणीभुत:- डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
----------------------------------------------
(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) ना.पंकजाताई मुंढे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री बीड असताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील १३ कोटी रुपयांचा बीडजवळ ते धानोरा-वरवटी-भाळवणी-बेलेश्वर रस्ता या २४ कि.मी.लांबीच्या व अंदाजित किंमत १२ कोटी ७५ लाख रू. रस्त्याचे पंकजाताईनी ३ सप्टेंबर २०१८ मध्ये भुमिपुजन केले होते,यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन, मा.आ.विनायक मेटे, सविता गोल्हार,अध्यक्ष जि.प.बीड, सविता मस्के, उपाध्यक्ष जि.प.बीड हजर होत्या. अत्यंत निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे ६ महिन्यात दोनदा काम झाले असुन रस्ता पावसाळ्याच्या सुरूवातीलाच उखडला गेला आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामाची मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री बीड यांना लेखी तक्रार केली असून क्वालिटी कंट्रोल मार्फत तपासणी करून संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत व अपहारीत रक्कम शासन तिजोरीत जमा करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
राजेंद्र मस्के यांचा पक्षबदल याच कामासाठी , अशा बोगस कामामुळेच पंकजाताईंचा पराभव, लोकात चर्चा
---------------------------------------------.- पंकजाताईं मुंढे यांनी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री बीड असताना ग्रामिण भागातील दळणवळणाची सोय व्हावी म्हणुन कोटयावधी रूपयांचा निधी मंजूर करून आणला, परंतु स्थानिक भ्रष्ट ठेकेदार यांनी ताईची दिशाभुल करत बोगस कामे करून निधी हडपला, याच कामासाठी राजेंद्र मस्के यांनी शिवसंग्राम पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला होता, अशा बोगस कामे आणि अरेरावीमुळेच पंकजाताई मुंढे यांचा पराभव झाल्याची चर्चा बालाघाटावरील कार्यकर्ते करताना दिसुन येतात.
मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री बीड यांना लेखी तक्रार
----------------------------------------------- सहा महिन्यांत दोनदा करून सुद्धा या निकृष्ट दर्जाचे कामाची तक्रार मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री बीड यांना केली आहे. अवैधरित्या खडी सेंटर, गौण खनिज चोरी, नळकांड्या पुल कागदोपत्री जास्त दाखवणे, भाळवणी गावाशेजारील नदिवरील जुना पुलच डागडुजी करून नवा दाखवणे, रस्त्याशेजारील विहिरींना संरक्षक कठडे न बांधणे, रस्त्याची जाडीव डांबर अत्यंत कमी वापरणे, रसत्याशेजारील मुरूम उकरून रसत्यावर टाकणे, त्यासाठी लिंबागणेश ते पोखरी रस्त्यावरील शासनाच्या मनरेगा अंतर्गत वृक्षलागवड व संगोपण अंतर्गत २५ लाख रुपये झाडांची जेसिबीच्या साहाय्याने कत्तल करणे आदि. गोष्टी महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्थेचे कार्यकारी अभियंता बेदरे यांच्याशी आर्थिक संगनमताने शासनाची फसवणूक केली आहे, संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा पन्हा आंदोलनांचा इशारा डॉ.गणेश ढवळे, लिंबागणेशकर यांनी दिला आहे.
ReplyForward |