पारगाव ग्रामपंचायतच्या कामाची चौकशी करण्याची शिवसेनीची मागणी
(उस्मानाबाद प्रतिनिधी --अनिकेत हारे) वाशी तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायत ने विविध योजनासाठी खर्च केलेल्या निधीची चौकशी करण्याच्या मागणी साठी जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनात करण्यात आली आहे
वाशी तालुक्यातील पारगाव येथील शिवसेनेचे जेष्ठ नेते बाबासाहेब हारे व युवा सेना धाराशिव जिल्हासरचिटणीस अँड,महेश आखाडे यांनी चौकशी ची मागणी केली आहे .यामध्ये त्यांनी 2016 ते 2020 अंतर्गत येथील ग्रामपंचायतीला विकास कामासाठी आलेल्या निधीमध्ये केवळ कागदोपत्री खर्च दाखवला असल्याचे म्हटले आहे यामध्ये मागील चार वर्षांपासून ग्रामपंचायत कडून खरेदी करण्यात आलेल्या झाडांची कुंडी ,जलशुद्धीकरण केंद्र, अंपग निधी,शेतकरी सहल, त्रस्त शेतकर्यासाठी बळीराजा चेतना अभियान,प्रत्सोहान निधी,दलित प्रत्सोहान निधी यासाठी आलेला निधी हा केवळ कागदोपत्री दाखवल्याचे निदर्शनास आल्याचे म्हटले आहे .तसेच मासिक सभा,ग्रामसभा ,खाते क्रंमाक 1 मध्ये अनियमितता असल्याचेही निदर्शनास आले आहे यासर्व बाबीची चौकशी करण्याच्या मागणी चे निवेदन 17 मार्च रोजी देण्यात आले आहे यावेळी स्मरण पत्राची दखल घेवुन प्रशासक नेमुण गुन्हे अन्वेषण विभागाकडुन याची चौकशी करण्याची मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.त्याचबरोबर जिल्हाधिकार्यानी याची दखल न घेतल्यास औरंगाबाद खंडपीठात जाण्याचा ईशारा शिवसेनेचे जेष्ठ नेते बाबासाहेब हारे व युवासेनेचे धाराशिव जिल्हा सरचिटणीस अँड, महेश आखाडे यांनी दिला आहे
ReplyForward |