शासकीय कार्यालयात पिण्याचे पाणी, शौचालय मुलभूत सुविधांची कमी मात्र रोगराई पसरण्याची शंभर टक्के हमी , जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन ,:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)
सहजिल्हानिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात शौचालय सुविधाच नाही, दारुच्या बाटल्या आणि दगडगोट्यांनी खचाखच भरलेले,घाणीचे साम्राज्य असणारे शौचालय ,
पिण्याच्या पाण्यासाठी जारचे पाणी,
---------------------------------------------
पिण्याच्या पाण्यासाठी" वरद डेव्हलपर्स" यांनी बांधलेले टाकी आहे, परंतु अस्वचछता असल्याने लोक विकत जारचे पाणी पितात. एवढंच नव्हे तर शासकीय अधिकारी व कर्मचारी सुद्धा विकत जारच्या पाण्यावरच तहान भागवतात.
---------------------------------------------- बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी असणारे दररोज कोट्यावधींची उलाढाल करणाऱ्या सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात येणा-या नागरिकांना म शौचालय, लघुशंकेसाठी व्यवस्थाच नाही, अस्तित्वात असलेल्या पुरूष शौचालय दारुच्या बाटल्या आणि दगडगोट्यांनी खचाखच भरलेले असुन घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
वरिष्ठ लिपिक गोपवाड :- पाण्याअभावी शौचालय बंद अवस्थेत
----------------------------------------------- मुद्रांक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक गोपवाड यांना या ठिकाणी येणा-या नागरिकांचीच नव्हे तर येथिल कर्मचारी यांना सुद्धा शौचालय व लघुशंकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शौचालयाचा आधार घ्यावा लागतो. याचवेळी येथिल पुरूष कर्मचारी उघड्यावर लघुशंका करताना आढळून आले आहे.
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर:- जिल्हाधिकारी यांनी सर्व शासकीय कार्यालयांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावी
----------------------------------------------- बीड शहरातील प्रमुख शासकीय कार्यालये याठीकाणी येणा-या नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, पिण्याचे पाणी, शौचालय या ठिकाणी स्वच्छता असणे गरजेचे आहे, परंतु मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहात दारुच्या बाटल्या, दगडगोटे युक्त शौचालय व घाणीचे साम्राज्य पसरले असुन साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सर्व शासकीय कार्यालये यांना तात्काळ मुलभुत सुविधा पुरवावी यासाठी जिल्हाधिकारी राहुलजी रेखावार यांना लेखी निवेदन दिले आहे.
ReplyForward |