( वाशी प्रतिनिधी-- अनिकेत हरे) पारगाव शहरातून जाणाऱ्या नॅशनल हायवे 52 वरती ट्रक व मोटारसायकल अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी दहाच्या दरम्यान घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की सोलापूर हुन बीड कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम पी 09 hh4187 बीड हुन सोलापूर कडे जाणारी मोटरसायकल क्रमांक mh13Bj5509 या गाडीला जोराची धडक दिल्यामुळे मोटारसायकलवरील दोघेजण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली या घटनेची माहिती कळताच वाशी पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले तसेच आय आर बी च्या अंबूलस मध्ये सदर जखमींना बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले आयआरबीची हायवे पेट्रोलिंग गाडी घटनास्थळी दाखल झाली होती