वंचित बहुजन आघाडीच्या  मागणीला यश कुंभार समाजाला  मूर्ती विकण्यासाठी  सरकारकडून परवानगी-प्रा.शिवराज बांगर 



 (बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)बीड जिल्ह्यातील सहा शहरे लॉकडाऊन असल्यामुळे कुंभार समाजाला तयार केलेल्या मूर्ती घरात पडून राहतात की काय अशा प्रकारची भीती सतावत होती. याच कालावधीमध्ये 15 ऑगस्ट च्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव व कुंभार समाजाचे नेते भीमराव दळे आणि वंचित बहुजन आघाडी चे कृतिशील बीड जिल्हा अध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांच्या नेतृत्वाखाली कुंभार समाजाने आपल्या मागण्या या संदर्भाने निवेदन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिले त्याच वेळेला धनंजय मुंडे यांनी ही मूर्ती विक्रीसाठी परवानगी देतो असे सांगितले होते आज प्रत्यक्षात त्याबाबत शासन आदेश काढून कुंभार समाजाला मूर्ती विकण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील कुंभार समाज बांधवांनी वंचित बहुजन आघाडीचे व श्रद्धेय  बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे  आभार मानले आहेत...