पारगाव येथे दुचाकीची चोरी
""वाशी तालुक्यात अवैध धंदामुळे चोरीचे प्रमाण वाढले""
(वाशी प्रतिनिधी--अनिकेत हारे) वाशी तालुक्यातील पारगाव येथील उद्धव मोहन आखाडे यांच्या घराचे लोखंडी कुंपण तोडून चोरट्यांनी दुचाकी (क्र. एमएच 25/ एएम/6805) लंपास केली ही घटना 15 ऑगस्ट च्या रात्री एक ते तीन वाजेच्या सुमारास घडली दरम्यान गावात सातत्याने चोरीची घटना घडत असल्याने ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण आहे. यासाठी गावातील मंजूर पोलीस दूरक्षेत्र त्वरित सुरू करावे अशीही मागणी होत आहे. या दुचाकी चोरीप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत पंरतु वाशी तालुक्यातील पारगाव परिसरात पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैध धंदे मोठया प्रमाणावर वाढले असुन याकडे वाशी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱयाची आर्थीक देवाण घेवाण असल्यामुळे यासर्व प्रकाराकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे तसेच पारगाव परिसरात पंधरा दिवसाला चोरीची घटत असल्यामुळे पारगाव येथे मंजुर पोलीस दुरक्षेत्र तात्काळ सुरू करण्यात यावे नसता येथील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात अाहेत