मंदिर प्रवेशाच्या आंदोलनावर टिका करणाऱ्या महाभागांनो...







#मंदिर प्रवेशाच्या आंदोलनावर टिका करणाऱ्या महाभागांनो...!!

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

    वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी पुढाकार घेतला आणि काही लोकांनी टिकेचा भडिमार केला...!!

    अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या भुमिकेवर टिका करणारे बहुतांश जण मी स्वतंत्र विचाराचा आंबेडकरवादी आहो, अशी मखलाशी करुन टिका करत सुटले...!!

कट्टरवादी बनुन टिका करणाऱ्या बेगडी लोकांनी, ऊठसुठ टिकेचा भडिमार करीत काय साध्य केले...??

     तुम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर समजले का..??

   #डॉबाबासाहेब आंबेडकरांनी २२प्रतिज्ञा धम्म अंगिकारण्या साठी दिल्या, धार्मिक जीवन जगण्यासाठी दिल्या, सार्वजनिक जीवनात राजकारण,सामाजकारण आणि अर्थकारण करतांना त्या २२प्रतिज्ञांचा वापर करायचा कशासाठी...??

   स्वत: डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात धर्माची आणि राजकारणाची सरमिरळ करु नका, तुम्ही धर्माचा संदर्भ राजकीय नेत्यांच्या संदर्भात वापरून धर्माची आणि राजकारणाची सरमिरळ करून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा विपर्यास करीत नाही का..??

     डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह तब्बल सहा वर्षे चालविला आणि स्वत: बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आम्हाला आजपर्यंत रामाचे दर्शन मिळाले नाही म्हणून आम्ही काही मेलो नाही तर रामाच्या दर्शनापेक्षा समाजात हक्क आणि अधिकारांची ज्योत पेटविणे हा मुख्य उद्देश मंदिर प्रवेशाच्या पाठिमागे होता...!!

   आजच्या विठ्ठल मंदिर प्रवेशाचा मुख्य उद्देश हा इथल्या व्यवस्थेने लादलेली हुकुमशाही झुगारण्याचा आहे तथा सर्वधर्मसमभाव वृद्धींगत करण्यासाठी हा मंदिर प्रवेश आहे याची तुम्हाला जाणीव होतं नसेल तर तुम्ही वैचारिक दिवाळखोर आहात असेच समजले पाहिजे...!!

    तुम्हाला २२प्रतिज्ञा देणा-या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात सर्वच धर्माच्या अनुयायांना आपापल्या उपासना आणि धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे त्या त्यांच्या उपासना आणि परंपरांचा मार्ग आजच्या शासनाने अवरुद्ध केला आहे तो मार्ग मोकळा करण्यासाठी मंदिर प्रवेश आहे..!!

 डॉ बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न झालेत, तुम्ही त्यांना केवळ २२प्रतिज्ञेचे जनक ठरवून त्यांना एका जातीचे किंवा धर्माचे ठरवून त्यांचं विश्वरत्न हे महापुरुषाच बिरुद तुम्हाला मान्य नाही का...??

   डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः ही भारतीयच आहे...!!

   मग अॅड बाळासाहेब आंबेडकर हे वारकरी संप्रदायातील आपल्या भारतीय भावंडांच्या मदतीला धावून जातं असतील तर त्यात गैर काय..??

   वारकरी संप्रदायाला टिकाकार भारतीय मानतं नाही का..??

    समतेचा संदेश देणा-या विठ्ठलाला तुम्ही भारतीय समजतं नाही का..??

    ज्या ज्या माणसांत राष्ट्रीयत्वाची भावना प्रबळ आहे त्याच्या साठी प्रथम प्राधान्य भारतीय या संज्ञेला आहे नंतर त्याचा धर्म आणि त्याची जात वा पोटजात आहे...!!

      तुम्हाला बुद्ध समजला का.??

 बुद्धाने मध्यममार्ग सांगितला तो कशासाठी..??

    तुम्ही टोकाचा मार्ग अवलंबून बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा विपर्यास करीत नाही का..??

   बुद्धाने चराचर सृष्टीतील सजीवांच्या कल्याणाची करुणा सांगितली, तुम्हाला तो करुणाभाव वारकरी संप्रदायातील लोकांसाठी वापरतांना अडचण का वाटतें,??

   मंदिरे बंद असल्यामुळे मंदिर परिसरातील दुकानदार टपरीधारक रस्त्यावरील ग़डेदोरे,मनी,कंगन,माळा,हार,तुरे, फोटो विकणारे असंख्य छोटे छोटे हातावरील पोट भरणारे  त्यांच्या चुली बंद पडल्या आहेत त्यांच्यासाठी तुमच्या मनात करुणाभाव निर्माण होतं नाही का..??

  मग तुम्हाला बुद्ध समजला का..??

 

   भारतातील अल्पसंख्याक समुह हा कट्टरवादाचा बळी आहे...!!

       ज्यांनी ज्यांनी धार्मीक कट्टरवाद जोपासला त्याला इतरांशी जुळवून घेता आले नाही आणि म्हणूनच मग तो एकांगी पडला आणि धार्मिक धृर्वीकरणाचा बळी ठरला...!!

    धर्म चार भिंतींच्या आत ठेऊन राजकीय प्लॅटफार्मवर सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता हाच खरा भारतीय नेता होय...!!

     काही जातींचे नेते आहेत तर काही धर्माचे नेते आहेत मात्र आज भारताला भारतीय नेतृत्वाची गरज आहे...!!

 राजकारणातील धर्माची सद्दी संपवून भारताला विश्व गुरु बनविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जाणाराच नेता पाहिजे...!!

   अॅड बाळासाहेब आंबेडकर हे सर्वांचे नेते बनुन राजकारण करीत आहेत अर्थातच ते भारतीय नेते आहेत,ते कुण्या एका जातीचे वा कुण्या एका धर्माचे नेते नाहीत हेही टिकाकारांनी समजून घ्यावे...!!

    तुम्ही आंबेडकरवादी म्हणवून घेता मात्र ब्राम्हणी व्यवस्थेचे वाहक झाले आहात आणि एका भारतीय नेतृत्वाला अॅड बाळासाहेब आंबेडकरांना एका जातीत किंवा एका धर्मात बांधून इथला मनुवाद भक्कम करीत आहात...!!

   कुणी जातियवाद्यांच्या सांगण्या वरुन टिका करीत आहे,तर कुणी धर्मांध शक्तींच्या सांगण्यावरुन टिका करीत सुटला आहे...!!

     मात्र तुम्ही विसरला आहात की,सच्चा आंबेडकरवादी माणूस अभ्यासाने,प्रचंड वाचनाने विवेकशील बनला आहे,तो तुमचं बिभीषणाचं रुप ओळखू लागला आहे...!!

      जयभीम.

@.. भास्कर भोजने.


 

 



 



 















ReplyForward