मांडवजाळी ग्रांमपंचायतीच्या दृष्टीने ४० वर्षांपासून असलेली ३० कुटुंबाची भिल्लवस्ती आस्तित्वातच नाही, घरकुल हवंय ५ हजार लागतील वरती द्यावे लागतात इति सरपंच :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


------------------------------------------------ ( बीड प्रतिनिधी --विवेक कुचेकर)बीड शहरापासून १० कि.मी.अंतरावर असणा-या माडवजाळी ग्रुपग्रांमपंचायत अंतर्गत वायकरवस्ती शेजारी रोडलगत ४० वर्षांपासून अस्तित्वात असणारी ३० कुटुंबियांची अंदाजे १५० लोकसंख्या असलेली भिल्लवस्ती कागदोपत्री आस्तित्वातच नाही त्यामुळे पाणी , शौचालय,व राशन धान्य आदि. मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ५००० रु प्रत्येक कुटुंबाने दिले तर मोठ्या साहेबांना देऊन घरकुलासाठी  काहीतरी करता येईल.


सविस्तर माहितीसाठी:- बीड तालुक्यातील मौजे मांडवजाळी ग्रुपग्रांमपंचायतीच्या अंतर्गत वायकरवस्ती शेजारी रोडलगत गावठाणातील जागेवर भिल्ल सामाजातील मुख्य व्यवसाय ऊसतोड मजूर असणारी ४० वर्षांपासून वास्तव्य यास अहणारी ३० कुटुंब व अंदाचे २५० लोकसंख्या लहानमूले,महिला,पुरूष एकुण आहेत. त्यांना पिण्याचे पाणी, शौचालय, घरकुल आदि.कुठल्याही मुलभुत सुविधा उपलब्ध नाहीत.


५००० रू द्या,वरती साहेबांना  द्यावे लागतात:- सरपंच
----------------------------------------------- सरपंच निताताई यांना भिल्लवस्ती ग्रामस्थांनी घरकुलाची मागणी असता, तुम्ही गावठाणातील जागेवर राहतात,तुमच्या नावावर
जमिन नाही, तुम्ही प्रत्येकी कुटुंबाने ५००० रु गोळा करून द्या.वरती साहेबांना द्यावे लागतात. मग तुम्हाला नावावर जागा करून देतो आणि मग घरकुल योजना मिळेल.


डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर:- माणुस म्हणून जगण्याचा अधिकार द्या. मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
----------------------------------------------- सर्व भिल्लवस्ती मधिल रहिवाशांना आधारकार्ड, राशनकार्ड काढलेले आहेत, परंतु राशन दुकानदार राशन धान्य देत नाही. पिण्याचे पाणी, शौचालय शिक्षणाची सोय आदि‌ कुठलीही मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही.घरकूल योजनेत नाव नाही ते टाकण्यासाठी सरपंच म्हणतात प्ररत्येकाने ५ हजार रुपये द्यावेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी, तहसिलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना लेखी निवेदन दिले आहे.